डायबेटीस आहे? तरीही खव्वयेगिरी आवरत नाही; तुमच्यासाठी खास चटपटीत स्नॅक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 06:54 PM2021-06-03T18:54:38+5:302021-06-03T18:59:25+5:30
त्यामुळे डायबेटीज रुग्णांनी खायच काय असा प्रश्न पडतो? घरच्यांनाही त्यांची चिंता असते म्हणून फार विचार करूनच अन्नपदार्थ बनवावे लागतात. त्यामुळे डायबेटीस रुग्ण बिनधास्त खाऊ शकतील असे पदार्थ आज आपण पाहणार आहोत.
डायबेटीस म्हटलं की खाण्यापिण्यावर अनेक मर्यादा येतात. गोड खाणं तर पूर्ण व्यर्ज. त्याशिवायही काही खायचं म्हटलं तर भरपूर विचार करावा लागतो. डायबेटीजमध्ये वजन वाढणंही धोकादायक आहे. त्यामुळे डायबेटीज रुग्णांनी खायच काय असा प्रश्न पडतो? घरच्यांनाही त्यांची चिंता असते म्हणून फार विचार करूनच अन्नपदार्थ बनवावे लागतात. त्यामुळे डायबेटीस रुग्ण बिनधास्त खाऊ शकतील असे पदार्थ आज आपण पाहणार आहोत.
डाळ इडली
डाळ इडली हा दाक्षिणात्य पदार्थ अत्यंत चविष्ट आणि हेल्दी आहे. यामध्ये तुम्ही चणाडाळ किंवा मुगडाळही वापरू शकता. याच्यात तुम्ही गाजर, कोबी अशा भाज्याही टाकू शकता. प्रोटीनने भरपूर असा हा पदार्थ डायबेटीसचे रुग्ण निश्चित खाऊ शकतात.
ढोकळा
सर्वांना आवडणारा ढोकळा बेसन किंवा सुजीपासून बनवला जातो. डायबेटीस पेशंट यात स्प्राऊट्स, पालकही घालू शकता. हा पौष्टीक ढोकळा इतरजणही खाऊ शकतात. यामध्ये स्प्राऊट्स आणि पालक असल्याने याच्यातील पोषणतत्वे दुपटीने वाढतात.
कारल्याची वडी
कारलं म्हटलं की अनेकांची तोंडे वाकडी होतील पण डायबेटीसच्या रुग्णांनी कारलं आवर्जुन खावं. यातील कडवटपणा जाण्यासाठी तुम्ही यात आमचूर, गाजर, ढोबळी मिर्ची, लिंबाचा रस घालून चटपटीत करून खाऊ शकता. ही टीक्की अगदी लहान मुलांनाही आवडेल अशी आहे.
मेथी मुथिया
मेथी आणि बेसनपासून तयार होणारा चविष्ट पदार्थ म्हणजे मेथी मुथिया. संध्याकाळी एक झटपट स्नॅक म्हणून तुम्ही खाऊ शकता. डायबेटीस रुग्णांनी मेथी खावीच त्यामुळे हा पदार्थही खा.
रताळ्याचं चाट
रताळ्याचं चाट हा पदार्थ तुम्ही पहिल्यांदाच ऐकला असेल. उकडलेल्या रताळ्यापासून हे बनवले जाते. यात तुम्ही चटपटीत चाट मसाला टाकून चवीने खाऊ शकता.