डायबिटिस असताना कोरोना झाला होता ? सावध व्हा, 'या' जीवघेण्या आजाराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 07:31 PM2022-11-21T19:31:30+5:302022-11-21T19:33:44+5:30

नुकत्याच झालेल्या संशोधनात एक माहिती समोर आली आहे. ज्या मधुमेही रुग्णांना कोरोना झाला होता त्यांना आता गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. 

have-you-came-corona-positive-while-having-diabetes-may-have-heart-risks | डायबिटिस असताना कोरोना झाला होता ? सावध व्हा, 'या' जीवघेण्या आजाराचा धोका

डायबिटिस असताना कोरोना झाला होता ? सावध व्हा, 'या' जीवघेण्या आजाराचा धोका

Next

२०२० आणि २०२१ हे दोन्ही वर्ष कोरोनामुळे सर्वांसाठीच खुपच कठीण गेले. अनेकांना कोरोनाची लागण झाली आणि त्यानंतर होणारा त्रासही अधिक होता. विशेष म्हणजे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे किंवा ज्यांना आधीच काही आजार आहेत त्यांच्यासाठी कोरोना फारच घातक ठरला. नुकत्याच झालेल्या संशोधनात एक माहिती समोर आली आहे. ज्या मधुमेही रुग्णांना कोरोना झाला होता त्यांना आता गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. 

अमेरिकन जर्नल ऑफ फिजिओलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार, कोरोनाग्रस्त मधुमेही रुग्णांना दीर्घकालीन समस्या दिसण्याची शक्यता आहे. अशा रुग्णांमध्ये हृदयविकार, विशेषत: हार्टफेल सारखे घातक परिणाम दिसण्याची शक्यता आहे. संशोधनातुन असे समोर आले की, मधुमेही रुग्णांमध्ये कोरोना व्हायरस हृदयात इंफ्लामेशन वाढवतो. यामुळे हार्ट फेल होण्याचा धोका असतो. ज्या मधुमेही रुग्णांना कोरोना झाला आहे त्यांनी आता जास्त सावधान राहण्याची गरज आहे.

कॉलेज ऑफ मेडिसिनचे शोधकर्ता डॉ दिनेंद्र सिंगला यांनी सांगितले, 'मधुमेही रुग्णांमध्ये कोरोनावेळी काही जेनेटिक मेकअप दिसले जे इंफ्लामेटरी समस्या वाढवणारे आहेत. याचे दुष्परिणाम मेंदु आणि हृदयावर होतात. यामुळे अशा रुग्णांनी वेळोवेळी हृदयाची तपासणी करण्याची गरज आहे जेणेकरुन असा धोका टाळता येईल. तसेच अशा रुग्णांमध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर चा धोकाही अधिक असतो.'

Web Title: have-you-came-corona-positive-while-having-diabetes-may-have-heart-risks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.