तुम्ही वजन कमी करण्यासाठी आईस थेरपीबद्दल ऐकलंय का? याचे दुष्परिणाम असतात गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 04:50 PM2021-07-05T16:50:03+5:302021-07-05T16:50:50+5:30

आजकाल वजन कमी करण्यासाठी नवनवीन गोष्टी ट्राय केल्या जात आहेत. कुणी किटो डाएट करते तर कुणी आणखी काही. सध्या वजन कमी करण्यासाठी एक नवीन थेरपी आली आहे. ती म्हणजे आईस थेरपी. या आईस थेरपीच्या साह्ह्याने वजन कमी करता येते. मात्र, या आईसथेरपीचे तोटेही भरपूर आहेत. ते कोणते ते जाणून घेऊयाच पण त्याआधी आईस थेरपी म्हणजे काय हे जाणून घेऊया...

Have you heard of ice therapy for weight loss? The side effects are serious | तुम्ही वजन कमी करण्यासाठी आईस थेरपीबद्दल ऐकलंय का? याचे दुष्परिणाम असतात गंभीर

तुम्ही वजन कमी करण्यासाठी आईस थेरपीबद्दल ऐकलंय का? याचे दुष्परिणाम असतात गंभीर

googlenewsNext

आजकाल वजन कमी करण्यासाठी नवनवीन गोष्टी ट्राय केल्या जात आहेत. कुणी किटो डाएट करते तर कुणी आणखी काही. सध्या वजन कमी करण्यासाठी एक नवीन थेरपी आली आहे. ती म्हणजे आईस थेरपी. या आईस थेरपीच्या साह्ह्याने वजन कमी करता येते. मात्र, या आईसथेरपीचे तोटेही भरपूर आहेत. ते कोणते ते जाणून घेऊयाच पण त्याआधी आईस थेरपी म्हणजे काय हे जाणून घेऊया. 
आईस थेरपी म्हणजे काय?
आपल्या शरीरात ज्या भागांवर जास्त चरबी आहे किंवा कमी वजनामुळे जे भाग जास्त लोंबकळत आहेत त्या भागांवर बर्फ चोळायचा. सतत बर्फ चोळल्यामुळे तेथील फॅट बर्न होते आणि तेथील चरबी कमी होते. मुख्यत: ही थेरपी हात, पोट, जांघेवर केली जाते. आईस थेरपी केल्यामुळे शरीर डिटॉक्सीफाईड व्हायलाही मदत होते. मात्र यातही डाएट आणि व्यायाम याला तितकंच महत्व आहे.

याचे दुष्परिणाम काय?
डायबिटीसच्या रुग्णांनी आईस थेरपीचा वापर अजिबात करू नये. त्वचेवर बर्फ रगडल्यामुळे तुमच्या नर्व्स सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो. यामुळे शरीरातील मधुमेहाचा धोका अधिक वाढतो.
जरी तुम्हाला डायबिटीस नसेल तरी आईस थेरपीचा वापर वजन कमी करण्यासाठी शक्यतो करू नका. आईस थेरपीचा वापर बऱ्याच काळासाठी केल्यास नेक्रोसिसला धोका पोहचू शकतो.
या थेरपीमध्ये त्वचेवर बराच काळ बर्फ चोळला जातो. त्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्वचा सुन्न होणे, लाल होणे, जळजळ होणे अशा समस्या उद्भवू शकतात.
आईस थेरपीमुळे पॅराडॉक्सिकल अ‍ॅडिपोज हाइपरप्लासिया यासारख्या दुर्मिळ आजारांचा धोका वाढतो. या आजारात जिथे बर्फ चोळला जातो त्या त्वचेखालील नसा फॅट कमी झाल्यामुळे त्याचा आकार लहान होण्याएवजी वाढतो.

Web Title: Have you heard of ice therapy for weight loss? The side effects are serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.