हेल्दी हार्टसाठी एक्सरसाइज आणि डाएटसोबतच 'हा' वेगळा उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 10:59 AM2019-08-27T10:59:46+5:302019-08-27T11:01:12+5:30

आपल्याकडे एकादा पाळीव प्राणी असावा असी अनेकजणांची इच्छा असते. त्यांच्यामुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवण्याच्या भितीमुळे अनेकजण प्राणी पाळणं टाळतात. पण तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही.

Having dog as a pet is good for heart health | हेल्दी हार्टसाठी एक्सरसाइज आणि डाएटसोबतच 'हा' वेगळा उपाय करा!

हेल्दी हार्टसाठी एक्सरसाइज आणि डाएटसोबतच 'हा' वेगळा उपाय करा!

Next

आपल्याकडे एकादा पाळीव प्राणी असावा असी अनेकजणांची इच्छा असते. त्यांच्यामुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवण्याच्या भितीमुळे अनेकजण प्राणी पाळणं टाळतात. पण तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही. कारण पाळीव प्राण्यांवर करण्यात आलेल्या अनेक संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, पाळीव प्राणी आपल्या आरोग्यासाठी विविध प्रकारे फायदेशीर ठरतात. तसेच काहि दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये समोर आलं आहे की, जर तुमच्याकडे एखादा कुत्रा असेल तर त्यामुळे तुमच्या हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. 

'मेयो क्लिनिक प्रोसीडिंग्स: इनोवेशन, क्वॉलिटी अ‍ॅन्ड आउटकम्स' मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये संशोधकांनी 1,769 लोकांवर रिसर्च केला आहे. संशोधनामध्ये सहभागी करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी कोणालाही हृदयाशी निगडीत कोणत्याही समस्या नव्हत्या. तसेच सहभागी झालेल्या व्यक्तींमध्ये काही जणांकडे पाळी प्राणी होते, तर काहींकडे नव्हते. 

रिसर्च सुरू असताना बॉडी मास इंडेक्स, डायट, फिजिकल अ‍ॅक्टिविटी, स्मोकिंग स्टेटस, ब्लड प्रेशर, ब्लड ग्लूकोज आणि कोलेस्ट्रॉल यांच्याआधारावर गुण देण्यात आले. संशोधकांनी यानंतर संशोधनामध्ये सहभागी असणाऱ्या पाळी प्राण्यांच्या मालकांची कार्डियोवस्क्युलर हेल्थची तुलना ज्या व्यक्तींकडे पाळीव प्राणी नव्हते त्यांच्याशी केली. 

संशोधनातून सिद्ध झालं की, अशा व्यक्ती ज्यांच्याकडे पाळीव प्राणी होते. त्यांच्या हृदयाचं आरोग्य ज्यांच्याकडे पाळी प्राणी नव्हते त्यांच्यापेक्षा उत्तम होते. या निष्कर्षामागे असं सांगितलं जात आहे की, कुत्रे इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेमध्ये जास्त अ‍ॅक्टिव्ह असतात. त्यामुळे त्यांना सांभाळणाऱ्या व्यक्तीही अ‍ॅक्विव्ह राहतात. हाच अ‍ॅक्टिव्हनेस त्यांच्या हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतो. 

संशोधनानुसार, कुत्र्यांमुळे मेंटल स्ट्रेस कमी करणं आणि सोशल अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होण्याचं प्रमाणही वाढतं. यामुळे तणाव दूर होऊन मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. यामध्ये पॉझिटिव्ह चेंज हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी उत्तम ठरतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झाल्या असून आम्ही त्या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणत्याही बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Having dog as a pet is good for heart health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.