Headache remedies: डोकेदुखी होईल दोन मिनिटांत गायब; बस ट्राय करा या सोप्या ट्रीक...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 05:23 PM2021-06-10T17:23:13+5:302021-06-10T17:26:53+5:30
headache relief tips: फार कमी लोकांना या चेहऱ्याच्या व्यायामाबद्दल माहिती आहे. फेशिअल एक्सरसाईज हा डोकेदुखीवरील मोठा उपाय मानला जात आहे. आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत, एकदा ट्राय करून नक्की पहा...
अनेकजणांना झोप झाली नाही, उन्हातून आल्याने किंवा मोबाईल, लॅपटॉपवर तासंतास असल्याने डोकेदुखीचा (headache) त्रास होतो. डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. जसे की शरीरात पाणी कमी, ऑक्सिजन कमी होणे किंवा न्युट्रीअंट्स कमी होणे. या डोकेदुखीच्या त्रासापासून मुक्तता मिळविण्यासाठी अनेकजण गोळ्या खातात. परंतू त्या हाणीकारक असतात. यामुळे चेहऱ्याचा व्यायाम हा एक त्यावरील पर्याय ठरत आहे. (headache relief tips: headache relief in 2 minutes)
फार कमी लोकांना या चेहऱ्याच्या व्यायामाबद्दल माहिती आहे. फेशिअल एक्सरसाईज हा डोकेदुखीवरील मोठा उपाय मानला जात आहे. आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत, एकदा ट्राय करून नक्की पहा...
स्टेप १
जर तुम्हाला डोळ्यांमुळे किंवा सायनसमुळे डोकेदुखी असेल तर दोन्ही हातांचे तर्जनीवर लव्हेंडर तेल घ्यावे आणि डोळ्यांच्या मध्ये नाकाच्या हाडावर मसाज करावा. डोकेदुखीवर हे तेल खूप फायदेमंद असते. यामुळे डोळ्यांनाही आरम मिळेल.
स्पेप २
दोन्ही हाताची चार चार बोटांनी भुवयांच्या मधोमध असलेल्या कपाळपट्टीवर फेशिअल ऑईलने मसाज करावे. हलका दाब द्यावा. डोळे बंद ठेवावेत आणि डोळ्यांवर दाब देऊ नये. हे करत असताना मोठा श्वास घ्यावा आणि सोडावा. हा मसाज तुम्ही 2 ते 3 मिनिटे करू शकता. डोकेदुखी पळून जाईल.
स्टेप ३
दोन्ही हातांची तर्जनी यु आकारात घ्यावी. त्याच्यावर फेशिअल ऑईल लावावे आणि भुवयांच्या वरील बाजुला हलक्या हातांनी स्लाईड करत मसाज करावा. जास्त दाब देऊ नये, नाहीतर डोकेदुखी कमी व्हायची सोडून आणखी वाढेल.
स्टेप ४
दीर्घ श्वास घेऊनदेखील डोकेदुखीपासून आराम मिळविता येतो. जेव्हा तुम्हाला डोकेदुखी होत असेल तेव्हा एका जाही बसून तुम्ही डोळे बंद करावेत आणि हळू हळू दीर्घ श्वास घ्यावा. काही मिनिटांतच तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळेल.