तीव्रतेनं जाणवणारी डोकेदुखीसुद्धा असू शकते कोरोनाचं लक्षण; सामान्य त्रास की कोरोनाचं लक्षण?, असं ओळखा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 11:02 AM2021-01-20T11:02:05+5:302021-01-20T11:16:10+5:30
CoronaVirus News & Latest Updates : जे लोक कोरोना संक्रमणाचा सामना करतात. त्यांना तीव्र डोकेदुखीचा सामना करावा लागतो. दरम्यान व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, एलर्जी किंवा इतर समस्या असतील तरी डोकेदुखीची समस्या उद्भवते.
डोकेदुखी कोरोना व्हायरसच्या सामान्य लक्षणांपैकी एक आहे. कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर ताप, वास न येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, डोकेदुखी अशी लक्षणं दिसायला सुरूवात होते. जे लोक कोरोना संक्रमणाचा सामना करतात. त्यांना तीव्र डोकेदुखीचा सामना करावा लागतो. दरम्यान व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, एलर्जी किंवा इतर समस्या असतील तरी डोकेदुखीची समस्या उद्भवते.
कोरोना रुग्णांमध्ये संक्रमणाच्या सुरूवातील डोकेदुखीची समस्या दिसून येते. दीर्घकाळ ही समस्या असेल तर गंभीर लक्षणांमध्ये याचे रूपांतर होऊ शकते. इस्तंबूल विद्यापीठात केलेल्या अभ्यासात, तुर्कीच्या संशोधकांच्या पथकाने कोरोना विषाणूची लागण नसलेले ३१९६ रुग्णआणि कोरोना पॉझिटिव्ह २६२ रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी कोविड-पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये डोकेदुखीची समस्या नोंदविली गेली.
७२ तासांपेक्षा अधिक डोकेदुखी
१० टक्क्यांहून अधिक रुग्णांच्या मते, कोरोना झाल्यास त्यांना ७२ तासांपेक्षा जास्त काळ डोकेदुखीची समस्या जाणवत होती. अशा परिस्थितीत हे कोरोनाचे लक्षण असू शकते. कारण सामान्य स्थितीत डोकेदुखी काही वेळानं बरी होते. डॉक्टरांनी देखील याची पुष्टी केली आहे की जर डोके किंवा स्नायूंमध्ये सतत ४८ ते ७२ तास सतत वेदना असतील तर ते कोरोनाचे लक्षण असू शकते. म्हणजेच सर्दी, ताप, खोकला तसंच डोकेदुखी हे कोरोनाच्या लक्षणांपैकी एक असू शकते.
असा ओळखा सामान्य आणि कोरोनामुळे होत असलेल्या डोकेदुखीतला फरक
कोरोना संक्रमणामुळे होत असलेली डोकेदुखी आणि इतर कारणांमुळे होणारी डोकेदुखी यात फरक दिसून येतो. कोरोनामुळे डोकेदुखी होत असेल तर पोटात दुखण्याची समस्या उद्भवते. ओटीपोटात वेदना होतात. सामान्य डोकेदुखीच्या समस्येत असा प्रकार दिसून येत नाही. कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर डोकेदुखीबरोबरच वास न येणं, उलटी, थकवा, भूक कमी लागणं, चव न समजणं अशा समस्या उद्भवतात. मृत्यूचं कारण ठरू शकतं नाकातील केस कापणं; तुम्हीसुद्धा असंच करत असाल तर वेळीच सावध व्हा
सामान्य डोकेदुखीमध्ये पेनकिलर्सने आराम मिळतो. पण जर कोरोनाचं संक्रमण झालं असेल तर पेनकिलर्सनेही आराम वाटत नाही. अशा स्थितीत लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क केल्यास योग्यवेळी उपचार घेता येऊ शकतात. अभ्यासांनुसार पुरुषांमध्ये कोरोनामुळे होत असलेल्या डोकेदुखीच्या वेदना महिलांच्या तुलनेत दुप्पट असू शकते. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. 'या' समस्यांवर रामबाण उपाय धण्याचे पाणी; रात्री भिजवून सकाळी प्याल तर आजारांपासून राहाल लांब