डोकेदुखी, थकवा आहेत लोहाच्या कमतरतेची लक्षण, होऊ शकतात गंभीर परीणाम...करा हे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 17:33 IST2021-06-10T17:32:20+5:302021-06-10T17:33:04+5:30
शरीराला आतून बळकट ठेवण्यासाठी आणि सर्व प्रकारांच्या आजारांशी लढण्यासाठी शरीराला लोह तत्त्वाची गरज असते.चला तर आज आपण शरीरातील लोहाची कमतरता कशा प्रकारे दूर करता येईल हे जाणून घेऊ.

डोकेदुखी, थकवा आहेत लोहाच्या कमतरतेची लक्षण, होऊ शकतात गंभीर परीणाम...करा हे उपाय
शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर आपल्याला थकवा आणि धाप लागण्यासारखे वाटू शकते. तसेच डोकेदुखीचाही त्रास होतो. शरीराला आतून बळकट ठेवण्यासाठी आणि सर्व प्रकारांच्या आजारांशी लढण्यासाठी शरीराला लोह तत्त्वाची गरज असते.चला तर आज आपण शरीरातील लोहाची कमतरता कशा प्रकारे दूर करता येईल हे जाणून घेऊ. शरीरामधील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आपल्या आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा. ते जाणून घ्या...
गूळ आणि शेंगदाणे
गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल. ह्याला आपण नियमित खाऊ शकता.
स्प्राऊट्स
अंकुरलेले कडधान्य सेवन केल्याने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. दररोज सकाळच्या नाश्त्याला स्प्राऊट्स खाणे योग्य आहे.
डाळिंब
डाळिंबात लोह मोठ्या प्रमाणात असतं. एक ग्लास कोमट दुधामध्ये 2 चमचे डाळिंबाचे चूर्ण टाकून प्यायल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
बीट
बिटाचे नियमित सेवनाने आपण आपल्या शरीरातील लोहाच्या कमतरतेला दूर करू शकता. बीटरूटला आपण सॅलड, रस किंवा सूप बनवून देखील पिऊ शकता.
ओट्स
ओट्स आपल्या शरीर आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. ह्याचा सेवन केल्याने आपण लोहाची कमतरता दूर करू शकता.
ड्रायफ्रुट्स
नियमितपणाने ड्राय फ्रूट्स सेवन करावे. आपण आपल्या दिवसाची सुरुवात बदामाच्या सेवना पासून देखील करू शकता. बदाम रात्रभर भिजत घालून सकाळी दुधाबरोबर घेणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
लिंबू
आपल्या आहारात व्हिटॅमिन सी समाविष्ट करणं उत्तम आहे. यासाठी आपण लिंबाचे सेवन करू शकता. ह्याचा मुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढतं. आपण सकाळच्या वेळी लिंबू पाणी घेण्यास सुरू करू शकता. त्याच बरोबर सॅलड वर लिंबाचा रस पिळून खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.