HEALTH : प्रत्येक दुखण्यावर उपयुक्त आहेत हे १० पॉइंट्स, जाणून घ्या Apply करण्याची योग्य पद्धत !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2017 12:04 PM2017-03-30T12:04:07+5:302017-03-30T17:37:13+5:30
विना औषधोपचाराने फक्त शरीराचे काही ठराविक पॉइंट्स दाबल्याने फायदा होतो. जाणून घेऊया त्या १० पॉइंट्सबाबत...
ॲक्युप्रेशर ही थेरपी तशी खूप जुनी आणि परिणामकारक आहे ज्यात विना औषधोपचाराने फक्त शरीराचे काही ठराविक पॉइंट्स दाबल्याने फायदा होतो.
ॲक्युप्रेशर आणि अल्टरनेटिव्ह मेडिसिन एक्सपर्ट डॉ. आर. के. कोडवानी यांचे म्हणणे आहे की, शरीरात वेगवेगळ्या भागात असलेले हे पॉइंट्स बहुतेक सर्वच समस्या आणि शारीरिक व्याधींवर उपयुक्त ठरु शकतात.
जाणून घेऊया त्या १० पॉइंट्सबाबत...
१) जॉईनिंग द वॅली
हा पॉइंट अंगठा आणि इंडेक्स बोटाच्या मध्यभागी असलेल्या कातडीच्या जागी असतो. याठिकाणी दाबल्याने डोकेदुखी, मानेचे दुखणे, दातदुखी, खांदादुखी, आॅर्थराइटिस शिवाय हॅँगओव्हर झाल्यास फायदेशिर ठरते.
२) पॅरिकार्डियम
हा पॉइंट हाताच्या पंजाच्या थोडा खाली मनगटावर असतो. याठिकाणी दाबल्याने अस्वस्थता, मोशन सिकनेस, वॉमेटिंग, पोटाची गडबड, डोकेदुखी, छाती दुखणे तसेच हाताच्या दुखण्यावर उपयुक्त ठरते.
३) थर्ड आय
हा पॉइंट डोळ्यांच्या वरती दोन्ही आयब्रोच्या मध्यभागी असतो. येथे दाबल्याने मानसिक शांती, मेमरी पॉवर, ताणतणाव, थकवा, डोकदुखी, डोळ्यांमध्ये दुखणे आणि झोपेच्या समस्येवर फायदेशिर ठरते.
४) सी आॅफ ट्रेंक्वालिटी
हा पॉइंट छातीच्या मध्यभागी असतो. याठिकाणी दाबल्याने एंग्जायटी, नर्वसनेस, डिप्रेशन, हिस्टीरिया आणि इमोशनल प्रॉब्लेम्समध्ये फायदा होतो.
५) लेग थ्री माइल्स
हा पॉइंट गुडघ्यांच्याखाली चार बोटाच्या अंतरावर असतो. याठिकाणी दाबल्याने इनडायजेशन, अॅसिडिटी, मलावरोध, पोट फुलणे, वॉमेट यासारख्या समस्येंपासून आराम मिळतो.
६) कमांडिंग मिडिल
हा पॉइंट ठिक गुडघ्याच्या मागे पोटरीवर असतो. याठिकाणी बॅकपेन, कमरेतील दुखणे, गुडघ्यांचा आॅर्थरायटिस शिवाय सायटिकामध्येही फायदेशिर ठरते.
७) शेन मेन
हा पॉइंट कानाच्या वरच्या बाजूला असतो. याठिकाणी दाबल्याने स्मोकिंगची सवय, तणाव, एंग्जायटी, डिप्रेशन तसेच झोपण्याच्या समस्येवर उपयुक्त ठरते.
८) हेवनली पिलर
हा पॉइंट डोके आणि मानेच्या मध्यभागी असतो. येथे दाबल्याने तणाव, एंग्जायटी, थकवा, डोकेदुखी, मानदुखी आणि झोपेच्या समस्येवर उपयुक्त ठरते.
९) सॅकरल पॉइंट्स
ज्याठिकाणी पाठीचा कणा संपतो तिथे असणाºया टेल बॉनजवळ हे भरपूर पॉइंट्स असतात. याठिकाणी दाबल्याने सायटिका, लोवर बॅकपेन शिवाय मासिक पाळीत येणाºया समस्येवर उपयुक्त ठरते.
१०) बिगर रशिंग
हा पॉइंट अंगठा आणि मोठे बोट यांच्या मधोमध असतो. याठिकाणी दाबल्याने डोळ्यांचा थकवा, हॅँगओव्हर, डोकेदुखी यावर फायदा होतो शिवाय प्रतिकारशक्तिदेखील वाढते.