HEALTH : ​ऐन तारुण्यातही मुला-मुलींना होऊ शकतात हे '१०' गंभीर आजार !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2017 06:27 AM2017-04-28T06:27:00+5:302017-04-28T11:57:00+5:30

सध्याच्या लाइफस्टाइलच्या कारणाने २० ते ३० दरम्यानच्या तरुणाईमध्येही गंभीर आजार होऊ लागले आहेत. जाणून घेऊया की, कोणकोणते आजार उद्भवू शकतात...

HEALTH: '10' serious illness can be caused by an infant in childhood! | HEALTH : ​ऐन तारुण्यातही मुला-मुलींना होऊ शकतात हे '१०' गंभीर आजार !

HEALTH : ​ऐन तारुण्यातही मुला-मुलींना होऊ शकतात हे '१०' गंभीर आजार !

Next
ong>-Ravindra More 
सध्याच्या लाइफस्टाइलच्या कारणाने २० ते ३० दरम्यानच्या तरुणाईमध्येही गंभीर आजार होऊ लागले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी न होणे, जंक आणि प्रोसेस्ड फूड जास्त खाणे, स्मोकिंग, ड्रिंकिंग, स्ट्रेस, फ्रस्टेशन आदी कारणाने बरेच आजार ऐन तारुण्यात दिसू लागले आहेत. 

जाणून घेऊया की, कोणकोणते आजार उद्भवू शकतात...
१) ओबेसिटी
* लक्षणे- ३० पेक्षा जास्त (बीएमआय) बॉडी मास इंडेक्स, महिलांमध्ये ३५ इंच आणि पुरुषात ४० इंचपेक्षा जास्त कंबर. 
* कारणे- जंक फू डचे सेवन, फिजिकली अ‍ॅक्टिव्हिटीजचा अभाव, कोल्ड्रिंग्ज, स्ट्रेस, टेन्शन आदी.

२) एंग्जायटी
* लक्षणे- थंड घाम येणे, जीव घाबरणे, झोपेतून उठून बसणे, ह्रदयाचे ठोके वाढणे, तोंड कोरडे पडणे, हात-पाय थरथरणे आदी.
* कारणे- तणावपूर्ण आयुष्य, आहाराची अनियमितता, मद्यपान, धुम्रपान, उच्च रक्तदाब आदी.

३) उच्च रक्तदाब
* लक्षणे- थकवा, घाम येणे, ह्रदयाचे ठोके वाढणे आदी.
* कारणे- अनहेल्दी लाइफस्टाइल, जंक फूड आणि प्रोसेस्ड फू ड जसे पास्ता, नूडल्स, पिझ्झा, सॉस आदी जास्त खाणे. 

४) डायबिटीज
* लक्षणे- थकवा जाणवणे, खाज येणे, जास्त भूक-तहान लागणे शिवाय जास्त लघवी लागणे
* कारणे- फिजिकली अ‍ॅक्टिव्हिटीजचा अभाव, फॅटी आणि जंक फूड जास्त खाणे शिवाय जास्त चहा, कॉफी कोल्ड्रिंग्ज पिणे.

५) डिप्रेशन
* लक्षणे- निराशा, कामात मन न लागणे, झोप न येणे, थकवा, अशक्त वाटणे, चिडचिड होणे आदी. 
* कारणे- जॉब किंवा अभ्यासाचे प्रेशर, लव्ह अफेर, पालकांच्या आशा-अपेक्षा आदी.

६) हार्ट प्रॉब्लेम
* लक्षणे- छातीत सतत डाव्या बाजूला दुखणे, हाता-पायांना मुंग्या येणे, श्वास फुलणे, पायºया चढताना धाप लागणे आदी.
* कारणे- जंक आणि प्रोसेस्ड फूड खाणे, फिजिकली अ‍ॅक्टिव्हिटीजचा अभाव, स्मोकिंग, ड्रिंकिंग, स्ट्रेस, टेन्शन आदी.

७) अस्थमा
* लक्षणे- छातीत सिकुडण्यासारखे आणि दबाव वाटणे, श्वास फुलणे, श्वास घेताना घाबरल्यासारखा आवाज होणे, थंडीत त्रास होणे आदी.
* कारणे- अ‍ॅक्टिव किंवा पॅसिव्ह स्मोकिंग, प्रदुषण, अ‍ॅलर्जी, प्रोसेस्ड फूड, अ‍ॅसिडिटी आदी.

८) चष्मा लागणे
* लक्षणे- लांबची किंवा जवळची वस्तू ब्लर दिसणे, बारीक अक्षर वाचण्यासाठी त्रास होणे, रात्री गाडी चालवायला त्रास होणे आदी.
* कारणे- वाचणे, स्मार्टफोन आणि कंप्युटरचा जास्त वापर, रात्री उशियापर्यंत जागरण करणे, शिवाय जास्त टिव्ही पाहणे.

९) लिव्हर प्रॉब्लेम
* लक्षणे- अशक्तपणा, थकवा, वजन कमी होणे, श्वासात दुर्गंधी, डोळे आणि त्वचेवर पिवळापणा येणे, मळमळ होणे, पोट फुलणे, पोटात दुखणे, डायरिया आदी.
* कारणे- आहाराचे संतुलन बिघडणे, ड्रग्ज, मद्यपान करणे आदी.

१०) कॅन्सर
* लक्षणे- प्रत्येक कॅन्सरचे वेगवेगळे लक्षणे आहेत. वजन कमी होणे, केस गळणे, पोटात त्रास होणे, अपचन, त्वचेच्या समस्या, खोकला तसेच ट्यूमर कॉमन लक्षण आहे. 
* कारणे- स्मोकिंग, ड्रिंकिंग, जंकफूड, अनहेल्दी लाइफस्टाइल, ड्रग्ज, प्रदुषण, रेडियशन आदी.  

Also Read : ​तारुण्यातील तणाव देतो उतारवयात त्रास

Web Title: HEALTH: '10' serious illness can be caused by an infant in childhood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.