तुम्हाला लवकर म्हातारे बनवतात या ५ चुकीच्या सवयी, वेळीच व्हा सावध....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 04:04 PM2021-11-25T16:04:06+5:302021-11-25T16:05:53+5:30

Health Tips : पब्लिक हेल्थ न्यू मेक्सिको स्टेट यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ. जगदीश खुबचंदानी यांनी पाच वाईट सवयींबाबत सांगितलं आहे. ज्यामुळे व्यक्तीचं वय वाढतं.

Health : 5 everyday bad habits that are aging you faster | तुम्हाला लवकर म्हातारे बनवतात या ५ चुकीच्या सवयी, वेळीच व्हा सावध....

तुम्हाला लवकर म्हातारे बनवतात या ५ चुकीच्या सवयी, वेळीच व्हा सावध....

googlenewsNext

Health Tips : प्रत्येक व्यक्तीमध्ये शरीराला नुकसान पोहोचवणाऱ्या काहीना काही वाईट सवयी असतातच. या सवयी केवळ आपल्या आरोग्यासाठीच हानिकारक नाही तर एजिंग प्रोसेसही वेगाने करते. पब्लिक हेल्थ न्यू मेक्सिको स्टेट यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ. जगदीश खुबचंदानी यांनी पाच वाईट सवयींबाबत सांगितलं आहे. ज्यामुळे व्यक्तीचं वय वाढतं.

स्ट्रेस - एक्सपर्टने सांगितलं की, 'कोणत्याही गोष्टीची चिंता सतत केल्याने तुम्ही लवकर म्हातारे होता. ते कोणत्याही मानसिक किंवा शारीरिक आजाराचे शिकार होऊ शकतात. आपल्याला हे जाणवत नाही. पण तणाव एक फार जीवघेणा आणि सायलेंट किलर आजार आहे. त्यामुळे जास्त काळ तरूण रहायचं असेल तर जास्त स्ट्रेस घेऊ नका'.

पुरेशी झोप न घेणं - पुरेशी झोप न घेणं ही सुद्धा एक मोठी समस्या आहे. जिचा तणावासोबत खोलवर संबंध आहे. झोप आपल्याला तरूण आणि तणाव मुक्त राहण्यासाठी मदत करते आणि एजिंग प्रोसेज हळुवार करते.  पण काही लोक याला गंभीरतेने घेत नाही. तरूणांमध्ये ही समस्या वेगाने वाढत आहे. ज्याचे साइड इफेक्ट भविष्यात दिसायला लागतात.

खराब डाएट - वेगाने वाढणाऱ्या वयासाठी किंवा लवकर येणाऱ्या म्हातारपणासाठी खराब डाएटही बरीच जबाबदार आहे. डॉ. खुबचंदानी म्हणाले की, २१ व्या शतकात सोडा, प्रोसेस्ड फूड आणि फॅटी फूडसारखे पदार्थ आपल्या डाएटचा मोठा भाग बनले आहेत. हे आपलं आरोग्य बिघडवण्यासाठी बरेच जबाबदार आहेत.

हालचाल न करणे  - एक्सरसाइज न करणे किंवा दिवसभरात शरीराची पुरेशी हालचाल न केल्याने याचा प्रभाव थेट आरोग्यावर पडतो. एक्सपर्ट सांगतात की, व्यक्ती अॅक्टिव राहिला नाही तर त्याला आजार लवकर होतात आणि ते वेगाने म्हातारे होऊ लागतात. एक्सरसाइज न करण्याचे बायोलॉजिकल, सायकॉलॉजिकल आणि फिजिकल तीन प्रकारचे प्रभाव असतात.

स्मोकिंग आणि ड्रिंकींग - स्ट्रेस आणि एन्जायटीपासून वाचण्यासाठी बरेच लोक एल्कोहोल, तंबाखू किंवा ड्रग्सचं सेवन करू लागतात. याकडे तरूण पीढी जास्त आकर्षित आहे. याच्या ओव्हरडोजने व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. पण त्याहीआधी याचं सतत सेवन केलं तर आपण लवकर म्हातारे होतो. याने मेंदू आणि वजनासंबंध समस्या वाढतात.
 

Web Title: Health : 5 everyday bad habits that are aging you faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.