Health Alert : ​आपणही ५-१० रुपयात बर्फाद्वारे "आजार" विकत घेत आहेत का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2017 09:10 AM2017-04-29T09:10:49+5:302017-04-29T14:40:49+5:30

ज्यूस, गोळे बनविणाऱ्या दुकानांवरील बर्फाचे सॅम्पल घेतले. तपासणी अंतर्गत सुमारे ७० टक्के सॅम्पल ‘ई-कोली' बॅक्टेरियायुक्त आढळले.

Health Alert: Are you buying "Disease" by Ice at 5-10 rupees? | Health Alert : ​आपणही ५-१० रुपयात बर्फाद्वारे "आजार" विकत घेत आहेत का ?

Health Alert : ​आपणही ५-१० रुपयात बर्फाद्वारे "आजार" विकत घेत आहेत का ?

googlenewsNext
ong>-Ravidra More
उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळण्यासाठी आपणही रस्ता लगतच्या दुकानांवरुन बर्फाचे गोळे, ज्यूस, बर्फाचे पाणी आदींचे सेवन करत असाल तर सावधान. नुकतेच मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने उन्हाळ्यात विकल्या जाणाऱ्या बर्फाच्या पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी ज्यूस, गोळे बनविणाऱ्या दुकानांवरील बर्फाचे सॅम्पल घेतले होते. तपासणी अंतर्गत सुमारे ७० टक्के सॅम्पल ‘ई-कोली' बॅक्टेरियायुक्त आढळले. हे बॅक्टेरिया पोटाच्या असंख्य समस्यांना कारणीभूत ठरतात. लोकांना या समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी बीएमसीने अशा बर्फाच्या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. 
प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात सर्वत्र पोटासंबंधी तक्रारी वाढू लागतात. या तक्रारींना कारणीभूत म्हणजे बॅक्टेरियायुक्त बर्फाच्या पदार्थांचे सेवन. 
विशेषत: बॅक्टेरियायुक्त बर्फाचे पदार्थ रस्त्या लगतचे रंग-बिरंगे ज्यूस, गोळे आदींच्या दुकानांवर आढळतात. या पदार्थात आढळणाऱ्या ई-कोलाय या बॅक्टेरियामुळे लिव्हर इन्फेक्शन, डायरिया, कोलायटिस यासारखे आजार उद्भवतात. 
तज्ज्ञांच्या मतानुसार ई-कोली बॅक्टेरिया विशेषत: बर्फात आढळतो, आणि उन्हाळ्यात लोक बर्फाचा जास्त वापर करतात म्हणून या बॅक्टेरियाचे संक्रमण होण्याची शक्यता या काळात जास्त असते. आपण या पदार्थाचे सेवन केल्याने त्याद्वारे हे बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे गॅस्ट्रो, लिव्हर इन्फेक्शनसह अन्य आजार होतात. हेपेटायटिस आणि डायरियासारखे आजार ई-कोलीच्या कारणाने होतात. जर संक्रमित रुग्णाने वापरलेला रुमाल, साबण, भांडे किंवा अन्य कोणतीही वस्तूचा वापर दुसऱ्याने केला तर तो देखील बॅक्टेरियाने संक्रमित होऊ शकतो आणि आजारी पडू शकतो. यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृह जिथे लोक ये-जा करतात, अशा ठिकाणी विशेषत: स्वच्छतेची काळजी घ्यावी. शिवाय या दरम्यान बाहेरील कुठलेही खाद्यपदार्थाचे सेवन करण्यापूर्वी ते चांगले स्वच्छ करुनच खावेत. रस्त्याकडचे कु ठल्याही प्रकारचे ज्यूस तसेच अर्धवट कापलेले फळ यांपासून चारहात लांबच राहावे.  

Also Read : ​HEALTH : १० रुपयात विकले जात आहेत चालते-फिरते आजार !
                                     : HEALTH : ​उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स पिताय, सावधान !

Web Title: Health Alert: Are you buying "Disease" by Ice at 5-10 rupees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.