Health Alert : सावधान, दूधासोबत चुकूनही करु नका ‘या’ पदार्थांचे सेवन !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2017 09:14 AM2017-04-06T09:14:47+5:302017-04-06T14:44:47+5:30
दूधासोबत काही पदार्थांचे सेवन पूर्णपणे वर्ज्य केले आहेत. जाणून घेऊया कोणते पदार्थ दूधासोबत खाणे वर्ज्य आहेत ते.
दूधासोबत काही पदार्थांचे सेवन पूर्णपणे वर्ज्य केले आहेत. जर दूधासोबत या पदार्थांचे सेवन केले तर शारीरिक व्याधी निर्माण होतात.
जाणून घेऊया कोणते पदार्थ दूधासोबत खाणे वर्ज्य आहेत ते.
* दूधासोबत लिंबू, कारले किंवा मीठ अजिबात सेवन क रु नये. याचा आपल्या शरीरावर अनिष्ट परिणाम होऊन बºयाच व्याधी निर्माण होऊ शकतात. याच्या सेवनाने त्वचारोग, खाज सुटणे, एगसिमा, सोरायसिस आदी समस्या निर्माण होऊ शकतात.
* दूधासोबत मूग, उडीद, हरबरा आदी सर्व दाळी, गाजर, बटाटा, तेल, गूळ, मध, दही, नारळ, लसुन, सर्व मीठयुक्त आणि आम्लीय पदार्थांचे सेवन अजिबात घेऊ नये. यांच्या मध्ये कमीत कमी दोन तासाचे अंतर अवश्य आहे. जर आपण उडीदाची दाळ दूधासोबत सेवन कराल तर आपणास ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो.
* दूधासोबत कधी मीठयुक्त आणि आंबट पदार्थ सेवन करु नये. तसेच एखाद्या खाद्यपदार्थामध्ये जर आपण मुळाचा प्रयोग केला असेल तर त्याच्या सेवनानंतर लगेचच दूधाचे सेवन करू नये. कारण अशाने दूध विष होऊ शकते, सोबतच त्वचेसंबंधी विकार निर्माण होतात. मुळापासून बनलेल्या पदार्थांच्या सेवनानंतर कमीत कमी दोन तासाच्या अंतराने दूध सेवन करु शकता.