Health Alert : उन्हाळ्यात टरबूज खाण्यापूर्वी असे तपासा, नाहीतर पडाल आजारी !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2017 12:49 PM2017-04-04T12:49:59+5:302017-04-04T18:19:59+5:30

सावधान! टरबूज घेताय? अगोदर चेक करा नंतरच घ्या. जाणून घ्या कसे चेक करायचे ते.

Health Alert: Check that before eating watermelon in the summer, otherwise it is sick! | Health Alert : उन्हाळ्यात टरबूज खाण्यापूर्वी असे तपासा, नाहीतर पडाल आजारी !

Health Alert : उन्हाळ्यात टरबूज खाण्यापूर्वी असे तपासा, नाहीतर पडाल आजारी !

Next
ong>-Ravindra More
उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी टरबूज खूप उपयुक्त मानले जाते. टरबूजमुळे शरीर फक्त फ्रेशच होत नाही तर शरीरात पाण्याचे संतुलनही कायम ठेवते. मात्र कमी पैशात जास्त नफा मिळावा म्हणून विक्रेत्यांकडून टरबूजला विषारी बनविले जाते. टरबूज लवकर पिकावे तसेच लाल भडक दिसावे म्हणून केमिकल इंजेक्ट केले जाते. यामुळे असे टरबूज खाल्लयाने फायदा ऐवजी शरीराला नुकसानच जास्त होते. 

* टरबूज पिकविण्यासाठी आॅक्सिटोसिन इंजेक्शनचा वापर केला जातो. सरकारने या इंजेक्शनवर कित्येक वर्षापासून बंदी घातली आहे. तरीही त्याचा सर्रास वापर सुरू आहे.

* आॅक्सिटोसिनने पिकविण्यात आलेल्या फळांचे सेवन केल्याने हार्माेन्स रिलेटेड आजार निर्माण होतात. याचा प्रभाव महिलांवर जास्त होतो.

* टरबूजमध्ये सोडियम सॅक्रिन आणि सिंथेटिक रंगाचा वापर केला जातो. टरबूजला गोड करण्यासाठी सॅक्रिन मिसळले जाते, मात्र हे आरोग्यासाठी घातक आहे. 

टरबूज घेण्यापूर्वी काय काळजी घ्याल?

* टरबूज घेण्यापूर्वी ते कापा, आवरणाच्या आतील भागाचा रंग फिकट पांढरा किंवा हिरवा असल्यास ते नैसर्गिक पिकलेले समजावे. जास्त लाल असल्यास त्यात  सिंथेटिक रंग मिक्स असल्याचे समजावे

* टरबूज खाण्यापूर्वी १० ते १५ मिनिट पाण्यात ठेवावे, यामुळे त्याला लागलेले केमिकल्स निघून जातात.

* टरबूज खूप प्रमाणात शायनी वाटत असेल तर तेदेखील पूर्णपणे न पिकण्याली ओळख आहे.

* टरबूज घेण्यापूर्वी चारही बाजूने तपासूनच घ्यावे, छिद्र असलेले किंवा कापून ठेवलेले टरबूज घेऊ नये.

 
         

Web Title: Health Alert: Check that before eating watermelon in the summer, otherwise it is sick!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.