Health Alert : ​जेवनानंतर लगेच करु नये ही कामे, होईल नुकसान !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 01:39 PM2017-05-18T13:39:17+5:302017-05-18T19:14:33+5:30

आरोग्य सुदृढ राहण्यासाठी काही नियम असतात, मात्र बऱ्याचजणांना हे नियम माहित नसतात आणि आजारांना आमंत्रण देतात.

Health alert: Do not do it immediately after the work, it will be damaged! | Health Alert : ​जेवनानंतर लगेच करु नये ही कामे, होईल नुकसान !

Health Alert : ​जेवनानंतर लगेच करु नये ही कामे, होईल नुकसान !

Next
ोग्य सुदृढ राहण्यासाठी काही नियम असतात, मात्र बऱ्याचजणांना हे नियम माहित नसतात आणि आजारांना आमंत्रण देतात. दैनंदिन जीवनात दिवसाच्या सुरुवातीपासून रात्री झोपण्यापर्यंत बरीच पथ्य असतात, त्यांचे पालन केल्यास आपण निरोगी राहण्यास मदत होते. चला जाणून घेऊया काही नियमांविषयी...

* अन्न पचनास थोडा वेळ लागत असल्याने जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये, शतपावली करावे. जेवण केल्यावर लगेच झोपल्याने गॅस व आतड्यांच्या संक्रमणाची शक्यता असते.

* जेवणादरम्यान किंवा जेवणानंतर फळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. फळे नेहमी जेवणाच्या काही वेळेपूर्वी खायला हवी. सकाळी नाश्त्यापूर्वी फळ खाणे योग्य आहे. 

* चहाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ल असते. यामुळे प्रथिनांच्या पचनावर वाईट परिणाम होऊन प्रथिनांची पचनक्रिया प्रभावित होते. म्हणून जेवणानंतर दोन तासांनी चाहा प्यायला हवा.  

* जेवणानंतर कित्येकांना सिगारेट ओढण्याची सवय असते. मुळात ही सवय तशी वाईटच आहे. कारण जेवल्यानंतर लगेच सिगारेट ओढणे दहा पटीने कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

* अंघोळ करताना हात व पाय सक्रिय असतात. यामुळे या भागातील रक्तप्रवाह वाढतो. पोटातीलही रक्तसंचार वाढल्यामुळे पचनक्रिया प्रभावित होते.

 

Web Title: Health alert: Do not do it immediately after the work, it will be damaged!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.