Health Alert : आपणास वारंवार लघवी होतेय का? असू शकतो हा आजार !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2017 07:10 AM2017-04-05T07:10:50+5:302017-04-05T12:40:50+5:30

वारंवार लघवी होण्याच्या समस्येला आपण सहज घेतो आणि भविष्यात हा आजार रूद्र रूप धारण करतो, जाणून घ्या कोणता आहे तो आजार..

Health Alert: Do you have urine repeatedly? It can be a disease! | Health Alert : आपणास वारंवार लघवी होतेय का? असू शकतो हा आजार !

Health Alert : आपणास वारंवार लघवी होतेय का? असू शकतो हा आजार !

Next
ong>-Ravindra More
असे पौरुष हार्मोन एंड्रोजनच्या कारणाने वारंवार लघवीची समस्या निर्माण होते. जसाही प्रोस्टेट ग्रंथिचा आकार वाढत जातो तसा मूत्र मार्गावर दबाव वाढतो, ज्यामुळे हळुहळु लघवीमध्ये अडथळे निर्माण होतात. 
प्रोस्टेट एका ग्रंथिचे नाव आहे, जी केवळ पुरुषांमध्येच आढळते. जन्माच्या वेळी याचे वजन नसल्यासारखे असते. 
२० वर्ष वयात याचे वजन २० ग्रॅम असते, २५ व्या वर्षी याचे वजन तेवढेच असते आणि ४५ व्या वर्षी वजनात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात होते. 
प्रोस्टेटच्या वाढीमुळे लघवीमध्ये अडथळे निर्माण होणे, हेच याचे सर्वात मोठे कारण आहे. विशेष म्हणजे ५० वर्ष वयानंतर याचे लक्षण जाणवायला लागतात. पश्चिमी देशांच्या तुलनेने भारतीय पुरुषांमध्ये हा रोग कमी वयातही जाणवायला लागतो. 

काय आहेत लक्षणे ?
लघवी वारंवार होणे हे प्रारंभिक लक्षण आहे. सुरुवातीला हे लक्षण रात्रीदेखील जाणवते. हळुहळु हे रुग्णाला दिवसभर त्रस्त करते. काही वेळानंतर रुग्ण यावर नियंत्रण करु शकत नाही आणि रुग्णास मूत्र विसर्जन करण्यास खूप त्रास होतो आणि शेवटी थेंबा-थेंबाने लघवी यायला लागते. कित्येकदा रुग्ण सांगतात की, त्यांना लघवी येत नाही. हे प्रोस्टेटचे प्रथम लक्षणही असू शकते. शिवाय बºयाचदा लघवी करताना खूप त्रास होतो तर कधी लवकर लघवी न होणे हेदेखील या आजाराचे लक्षण आहे. 

लक्षणे दिसल्यावर काय कराल?
प्रोस्टेटचे लक्षणे जाणवताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. तज्ज्ञ यादरम्यान रुग्णाची लघवी आणि रक्ताची तपासणी करतात तसेच सोनोग्राफीदेखील करतात. सोनोग्राफीद्वारे प्रोस्टेटचे वजन आणि विसर्जनानंतर मूत्राशयात किती मूत्र शिल्लक राहते याचाही तपास करतात. जास्त प्रमाणात जर मूत्र शिल्लक राहत असेल तर हा गंभीर विषय आहे. प्रोस्टेट कॅन्सरचे निदान रक्तात प्रोस्टेट स्पेसीफिक एंटीजन (पीएसए)च्या परिक्षणाने केले जाते.   

उपचार
बऱ्याच प्रकरणात याचा उपचार औषधाने पूर्ण केला जातो. तसेच काही रुग्णांमध्ये मेडिसिनच्या आधारे शस्त्रक्रिया काही काळापर्यंत टाळली जाऊ शकते. वयाच्या ५० व्या वर्षी रुग्णास अन्य काही आजारही असतात म्हणून एनेस्थीसिया दिल्याने समस्याही निर्माण होऊ शकतात. यासाठी विशेषज्ञ शस्त्रक्रिया ऐवजी औषधोपचाराला प्राधान्य देतात.   
 

Web Title: Health Alert: Do you have urine repeatedly? It can be a disease!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.