Health Alert : आपण खात असलेले तांदूळ प्लास्टिकचे तर नाहीत ना, असे ओळखा !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2017 01:48 PM2017-06-06T13:48:27+5:302017-06-06T19:18:27+5:30
नुकतेच उत्तराखंडात प्लास्टिकचे तांदूळ आढळले असून पून्हा एकदा भेसळयुक्त खाद्यपदार्थांबाबतचा विषय चर्चेत आला.
नुकतेच उत्तराखंडात प्लास्टिकचे तांदूळ आढळले असून पून्हा एकदा भेसळयुक्त खाद्यपदार्थांबाबतचा विषय चर्चेत आला. भारतात खाद्य पदार्थांची विक्री एक सामान्य बाब झाली आहे.
भाजीपाल, मिठाई, दूध, फळ, अंडे तसेच अन्य पदार्थांत भेसळ होणे सर्वांनाच माहित आहे, मात्र आता तांदूळदेखील प्लास्टिकचे बनू लागले हे ऐकून आश्चर्यच वाटेल.
प्लास्टिकचे तांदूळ चीनमध्ये बनतात, जे दिसायला साधारण तांदळासारखेच असतात. शिजविल्यानंतर तर दोघांमधला फरक ओळखणे मोठे कठीण असते. चीनमध्ये मिळणारा प्लास्टिकचा तांदूळ आता भारतातही मिळू लागला आहे.
* आरोग्यासाठी घातक
प्लास्टिकचे तांदूळ बाजारात साधारण तांदळात मिक्स करून विकले जातात. त्यांचा स्वाद, रंग आणि आकार पाहून आपण हे तांदूळ प्लास्टिकचे आहेत असे म्हणूच शकणार नाहीत.
* होऊ शकतो कॅन्सर
या तांदळाच्या सेवनाने अगोदर पोटाच्या समस्या निर्माण होतील आणि नियमित सेवन केल्यास कॅन्सरचा धोका होण्याची शक्यता आहे.
* कसे बनतात प्लास्टिकचे तांदूळ
प्लास्टिक तांदूळ बनविण्यासाठी बटाटा, गोड बटाटे आणि प्लास्टिकचा प्रयोग केला जातो. यामुळे या तांदळाला साधारण तांदळाचा आकार मिळतो.
* प्लास्टिकसारखा जळतो
प्लास्टिक तांदूळ शिजल्यानंतर कठीणच राहतो. त्यातून निघणारे तांदुळाचे पाणी जेव्हा घट्ट होते तेव्हा दिसायला प्लास्टिकसारखेच दिसते आणि त्याला कोरडे झाल्यानंतर जाळले तर प्लास्टिकसारखेच जळते.
* असे ओळखा
प्लास्टिकचा तांदूळ साधारण तांदळापेक्षा जास्त चमकदार, वजनाने हलका, विना तुटणारा आणि स्वच्छ असतो. याला शिजायलादेखील खूप वेळ लागतो. शिवाय प्लास्टिकचा तांदूळ पाण्यावर तरंगत नाही कारण हे शंभर टक्के प्लास्टिक नसते. यात बटाटा आणि गोड बटाटादेखील मिक्स असतो.
Also Read : आपण 'प्लास्टिक'ची अंडी तर खात नाही ना? खरी की खोटी, असे ओळखा !