Health Alert : अगरबत्तीपासून होणारे शारीरिक नुकसानबाबत जाणून व्हाल थक्क !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2017 08:06 AM2017-05-31T08:06:13+5:302017-05-31T13:36:13+5:30

आपण आपल्या घरातील मंदीरात पूजा करतेवेळी अगरबत्तीचा वापर करीत असाल तर हे आप ल्या शरीरासाठी हानिकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Health Alert: If you know about physical damage due to agarbattics! | Health Alert : अगरबत्तीपासून होणारे शारीरिक नुकसानबाबत जाणून व्हाल थक्क !

Health Alert : अगरबत्तीपासून होणारे शारीरिक नुकसानबाबत जाणून व्हाल थक्क !

googlenewsNext

/>आपण आपल्या घरातील मंदीरात पूजा करतेवेळी अगरबत्तीचा वापर करीत असाल तर हे आप ल्या शरीरासाठी हानिकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
जाणून घेऊया अगरबत्तीपासून होणाºया नुकसानाबाबत..

* त्वचेची अ‍ॅलर्जी
जास्त वेळ अगरबत्तीचा उपयोग केल्याने डोळे आणि त्वचेची अ‍ॅलर्जी निर्माण होऊ शकते. अगरबत्ती जाळल्याने त्यातून निघणारा धुर डोळ्यात जळजळ निर्माण करु शकतो. याशिवाय संवेंदनशील त्वचेचे लोक या धुराच्या संपर्कात आल्यास त्यांच्या त्वचेवर खाज निर्माण होऊ शकते. 

* श्वासाचे संक्रमण 
नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार अगरबत्ती जाळल्याने हवेत कार्बन मोनोआॅक्साइड पसरतो, ज्यामुळे फुफ्फूसात सूज आणि श्वासासंबंधी कित्येक समस्या निर्माण होतात. हा धुर धूम्रपानाच्या वेळी फुफ्फूसात जाणाºया धूरासारखा असतो. 

* गळ्याचा कॅन्सर
अगरबत्तीचा वापर केल्याने गळ्याचा कॅन्सरदेखील होऊ शकतो. या धुरामुळे श्वास नलिकेच्या वरील भागात कॅन्सर होण्याचा धोक ा वाढू शकतो. 

* मेंदूचे विकार
नियमित अगरबत्तीचा वापर केल्यास डोकेदुखी, लक्ष विचलित होणे शिवाय स्मृतिभ्रंश अशा समस्या निर्माण होऊ शकतात. 

* ह्रदयाला हानी
अगरबत्तीचा धूर ह्रदयाला हानिकारक असतो. जास्त वेळ अगरबत्तीच्या संपर्कात राहिल्याने ह्रदयरोगाने मृत्यू होण्याच्या प्रमाणात १० ते १२ टक्कयाने वाढ होऊ शकते. 


Web Title: Health Alert: If you know about physical damage due to agarbattics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.