HEALTH ALERT : सकाळच्या ‘या’ सहा वाईट सवयींमुळे वाढते वजन !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2017 07:51 AM2017-04-04T07:51:09+5:302017-04-04T13:21:09+5:30
कदाचित या वाईट सवयी आपल्यातही असतील, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या सवयी आणि त्यावरील उपाय !
सकाळच्या काही वाईट सवयी आपले वजन वाढण्यास कारणीभूत आहेत. या सवयी आपल्या मेटाबॉलिज्म(फॅट बर्निंग)प्रोसेसमध्ये अडथळा निर्माण करते, ज्याकारणाने शरीरामध्ये कॅलरीज व्यवस्थितप्रकारे बर्न होत नाहीत. नंतर ह्याच कॅलरीज चरबीमध्ये बदलून वजन वाढण्यास मदत होते. काही तज्ज्ञांनी वजन वाढण्यास कारणीभूत सहा वाईट सवयींबाबत सांगितले आहे. त्याबाबत जाणून घेऊया,
१) जास्त झोप
सकाळी उशिरापर्यंत (८ तासापेक्षा जास्त)झोपल्याने शरीरात कॉर्टिसोल स्ट्रेस हार्मोन तयार होण्यास सुरुवात होते. या हार्माेनमुळे शरीरात चरबी वाढण्यास मदत होते.
२) सकाळच्या उन्हाचा अभाव
सकाळच्या उन्हातील अल्ट्राव्हायलेट किरणांमुळे फॅट बर्निंग प्रोसेस वेगाने कार्यान्वित होते. नियमित सकाळी २० ते ३० मिनिट उन्हात न गेल्याने चरबी वाढू लागते.
३) नास्ता न करणे
जे लोक सकाळी नास्ता करीत नाहीत, त्यांची फॅट बर्निंग प्रोसेस मंद होते. नास्त्यात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश नक्की करावा.
४) व्यायामाचा अभाव
नियमित कमीतकमी २० मिनिट सकाळी व्यायाम न केल्याने शरीरात मेटाबॉलिज्म (फॅट बर्निंग प्रोसेस) मंद होते. यामुळे वजन वाढू शकते.
५) उच्च कॅलरीजयुक्त स्रॅक्सचे सेवन
सकाळी पोट एकदम रिकामे असते, अशावेळी उच्च कॅलरीयुक्त स्रॅक्स जसे चिप्स, सँडविच, बर्गर आदींचे सेवन केल्याने याचे रुपांतर फॅटमध्ये होते. यामुळे वजन वाढू लागते.
६) पाणी न पिणे
सकाळी एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी न पिल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघत नाहीत, त्यामुळे फॅट बर्निंग प्रोसेस मंद होते आणि लठ्ठपणा वाढतो.
काय उपाय कराल?
१) मेडिटेशन
रोज सकाळी कि मान १० मिनिट मेडिटेशन करा. यामुळे ताणतणाव कमी होईल आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदतही होईल.
२) ३० मिनिट वॉक किंवा एक्झरसाइज
रोज किमान ३० मिनिट वॉक किंवा एक्झरसाइज करा. याने फॅट बर्न होते आणि शरीर यंत्रणाही सुरळीत राहते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
३) सकाळचे उन्ह
रोज सकाळी किमान १५ ते २० मिनिट उन्हात राहिल्याने मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
४) कोमट पाणी
सकाळी एक ग्लास कोमट पाणी पिल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात, शिवाय चरबीदेखील कमी होण्यास मदत होते.
५) ग्रीन टी
सकाळी दूधाचा चहा पिण्याऐवजी विनासाखरेचा ग्रीन टी किंवा हर्बल टी प्या. यातील अॅन्टिआॅक्सिडेंट्समुळे फॅट बर्निंग प्रोसेसला गती मिळते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
६) लिंबूपाणी
एक्झरसाइजनंतर एक ग्लास लिंबूपाणी प्यावे, यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही.