Health Alert : चहा चपातीचा नाश्ता खाऊन बाहेर पडणं खरंच हेल्दी आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2017 12:36 PM2017-06-01T12:36:33+5:302017-06-01T18:06:33+5:30

आपणही सकाळी चहा चपातीचा नाश्ता करीत असाल तर आपल्यासाठी हि माहिती अति महत्वाची आहे...

Health Alert: Is it really healthy to eat tea chapati breakfast? | Health Alert : चहा चपातीचा नाश्ता खाऊन बाहेर पडणं खरंच हेल्दी आहे का ?

Health Alert : चहा चपातीचा नाश्ता खाऊन बाहेर पडणं खरंच हेल्दी आहे का ?

googlenewsNext
े म्हणतात की, सकाळचा नाश्ता राजा सारखा, दुपारचे जेवण मध्यम आणि रात्रीचे जेवण गरीबासारखे करावे. असे केल्यास आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. मात्र सध्याच्या धावपळीच्या युगात बहुतांश लोकांना सकाळचा नाश्ता राजा सारखा करण्यास वेळच नाही, अगदी घाई घाईत मिळेल ते खाऊन घराबाहेर पडतात. त्यातच अनेकजण फक्त सकाळी बनणारी गरम गरम चपाती आणि चहा हा नाश्ता घेताना दिसतात. मात्र चहा चपातीचा हा नाश्ता खाऊन बाहेर पडणं खरंच हेल्दी आहे का?       
चहा चपाती एकत्र खाल्ल्याने त्यामधून मिळणारी पोषकद्रव्य फारच कमी असतात म्हणून नाश्त्याला चहा चपाती हा पर्याय फारसा आरोग्यदायी नसल्याचे चिफ डाएटिशन सुनिता रॉय चौधरी यांनी म्हटले आहे. सकाळी उठल्यानंतर शरीराला दिवसभर लागणारी उर्जा सकाळच्या नाश्त्यामधून मुबलक मिळणे गरजेचे आहे. चहा हे कॅफिनयुक्त पेय असल्याने दिवसाची सुरवात त्याने करणं आरोग्यदायी नाही. कोणताही अन्नपदार्थ चहासोबत घेणे त्रासदायकच आहे. तसेच चहा चपाती या कॉम्बिनेशनमधून आयर्न आणि कॅल्शियम शरीरात मुबलक प्रमाणात शोषले जात नाही. सकाळच्या नाश्त्यामधून काबोर्हायड्रेट आणि प्रोटीन घटक मुबलक मिळणे गरजेचे आहे. चहा चपातीमधून ही गरज पूर्ण होत नाही. परिणामी शरीराला उर्जा आणि पोषणद्रव्य यापैकी काहीच मिळत नाही.

* नाश्त्यात वापरा हे हेल्दी पदार्थ 
चहा चपाती ऐवजी नाश्त्यात भाजी चपाती किंवा दही चपाती, अंड, दूध, पनीर यांचा समावेश करा. सोबतच काबोर्हायड्रेट्स मिळवण्यासाठी दलिया किंवा रव्यापासून बनवलेले पदार्थ म्हणजेच उपमा, अप्पम यांचा समावेश अधिक करा. इडली सांबार हा सकाळच्या नाश्त्याला एक उत्तम आणि परिपूर्ण पर्याय असून यातून शरीरला पोषकद्रव्य मिळण्यास मदत होते. 

Also Read : ​निरोगी जीवनासाठी ब्रेक फास्ट महत्त्वाचा
                  : ​हेल्दी ब्रेकफास्ट हवाय ?

Web Title: Health Alert: Is it really healthy to eat tea chapati breakfast?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.