​HEALTH ALERT : रात्रपाळी काम करणाऱ्याना होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2017 08:50 AM2017-05-16T08:50:24+5:302017-05-16T14:20:24+5:30

आपणही रात्रपाळी काम करताय? तर वेळीच सावध व्हायला हवे...जाणून घ्या..!

HEALTH ALERT: Night-time worker can be 'ha' serious illness! | ​HEALTH ALERT : रात्रपाळी काम करणाऱ्याना होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार !

​HEALTH ALERT : रात्रपाळी काम करणाऱ्याना होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार !

Next
ा नव्या संशोधनानुसार रात्रपाळी (नाईट शिफ्ट)मध्ये काम करणारे वेळेवर जेवण करु शकत नसल्याने याचा परिणाम यकृतावर होऊन त्यासंदर्भात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या आपल्या आरोग्यासाठी धोक्याच्या ठरु शकतात. 
या संशोधनात संशोधकांनी उंदरांच्या पाचन क्षमतेचा अभ्यास केला. या अध्ययना दरम्यान, उंदारांना रात्रीच्या वेळेस चारा दिला. तर दिवसाच्या वेळेत, त्यांना आराम करु दिला. यानुसार संशोधकांना दिवसा काम करणाऱ्याच्या तुलनेत रात्रपाळी काम करणाऱ्याच्या यकृताचा आकार वाढत असल्याचे आढळले. तसेच यकृताचा आकार वाढताना त्याची ग्रहण करण्याची क्षमता वाढते, असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.
सेल नावाच्या पत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यात तुमची दैनंदिन क्रियेची लय बिघडते, तेव्हा त्याचा परिणाम यकृतावर होत असल्याचं म्हणलं आहे.
जिनेव्हा विश्वविद्यालयाचे शोधप्रमुख फ्लोर सिंटूरल यांनी सांगितलं की, ‘रात्रीच्या वेळस यकृताचा आकार ४० टक्के वाढतो तर दिवसा याचा आकार पूर्वीप्रमाणे असतो. जीवनपद्धती बदलल्यास त्याचा परिणाम शरिरातील कार्यप्रणालीवर होतो.’

Web Title: HEALTH ALERT: Night-time worker can be 'ha' serious illness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.