Health Alert : ‘नोमोफोबिया’..एक स्मार्टफोनचं व्यसन !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2017 11:08 AM2017-04-08T11:08:41+5:302017-04-08T16:38:41+5:30

‘नोमोफोबिया’ हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. याला एक स्मार्टफोनचं व्यसनदेखील म्हणता येईल. हे व्यसन ज्याला जळले तो व्यक्ती मोबाइलशिवाय राहूच शकत नाहीत.

Health Alert: 'Nomophobia' .. A Smartphone Addiction! | Health Alert : ‘नोमोफोबिया’..एक स्मार्टफोनचं व्यसन !

Health Alert : ‘नोमोफोबिया’..एक स्मार्टफोनचं व्यसन !

googlenewsNext
ong>-Ravindra More
‘नोमोफोबिया’ हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. याला एक स्मार्टफोनचं व्यसनदेखील म्हणता येईल. हे व्यसन ज्याला जळले तो व्यक्ती मोबाइलशिवाय राहूच शकत नाहीत. त्यांना फोन हरवण्याची, बॅटरी संपण्याची, नेटवर्क नसण्याची सततची भीती असते. अशा व्यक्ती सतत मोबाइलमध्येच व्यस्त असतात. हळूहळू ते कुटुंबापासून लांब होऊन आपल्याच विश्वात रममाण होताना दिसतात. एवढेच नव्हे तर त्यांना तहान-भूक याचीही शुद्ध नसते. थोडक्यात यामुळे त्या व्यक्तीचा वैयक्तिक विकासाचा मार्ग खुंटतो व घसरणीला लागतो.
 २००८ मध्ये इंग्लंडमध्ये ‘नोमोफोबिया’चा पहिला रुग्ण पाहावयास मिळाला. जगभरातील ‘नोमोफोबिया’विषयी अभ्यास केला असता असे आढळून आले की, जगभरामध्ये ६६ टक्के लोकांमध्ये ‘नोमोफोबिया’ची लक्षणे दिसून आली.
गेल्या चार वर्षात ‘नोमोफोबिया’चे प्रमाण ६३ टक्के वाढले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ‘नोमोफोबिया’ची लक्षणे सर्वात जास्त दिसून आली. पुरुषांचे ६६ टक्के तर स्त्रियांचे ७१ टक्के असे हे प्रमाण होते.
 मोबाइलच्या अति आणि सततच्या वापराने पाठीच्या कण्यावर खूप प्रेशर येते. कारण मोबाईल वापरताना आपली मान ६० डिग्री मध्ये खाली झुकलेली असते. मोबाईल फोनमुळे शारीरिक व मानसिक ताकद खर्च होऊन आळशीपणाही वाढत चालला आहे. 
याच्या अतिवापराने चिडचिड होणे, एकलकोंडेपणा निर्माण होणे, डोळ्यांची जळजळ व लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. वेळेचे व्यवस्थापन देखील कोलमडते. त्यामुळे वेळीच मोबाईल वापरावर नियंत्रण आणले तर त्याचे व्यसन लागत नाही.

‘नोमोफोबिया’पासून सावध करण्यासाठी सूचना
* स्मार्टफोनचा वापर स्मार्टली करणे आवश्यक.
* उगाचच अनावश्यक अ‍ॅप किंवा गेम्स घेणे टाळावे.
* नोटिफिकेशन बंद ठेवा, कारण सततची येणारी नोटिफिकेशन्स आपले लक्ष विचलित करतात.
* मेसेज व इतर गोष्टी पाहण्यासाठी 
* ठरावीक वेळ ठरवा. जेणेकरून फोन सतत हातात राहणार नाही.
* झोपताना फोन बंद ठेवा म्हणजे झोपही छान येईल व फोनच्या धोकादायक किरणांपासून संरक्षण मिळेल.
या सर्व गोष्टींचा विचार केला असता त्या अमलात आणणे कठीण नाही, फक्त त्याला जरा वेळ द्यावा लागेल. व्यसन सोडावयाचे म्हणजे वेळ हा द्यावा लागणारच. परिसरात असणाºया व्यक्ती/ मित्र/ शेजारी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क ठेवण्याचे अनेक अप्रत्यक्ष फायदेही असतात, हे ध्यानात ठेवायला हवे.  

Web Title: Health Alert: 'Nomophobia' .. A Smartphone Addiction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.