HEALTH ALERT : प्रेग्नेंसीला बाधक ठरतात ‘ही’ १० कारणे, पुरुषही आहेत जबाबदार !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2017 06:52 AM2017-04-04T06:52:05+5:302017-04-04T12:22:05+5:30
आपणासही बाळ हवय, मात्र काही कारणाने आपण मुलाच्या सुखापसून वंचित आहात. तर जाणून घ्या कोणती आहेत ती कारणे.
Next
‘ह्यूमन रिप्रोडक्शन’मध्ये प्रकाशित आताच्या अभ्यासानुसार, कित्येक कपल्सची इच्छा असूनही ते मुलाला जन्म देऊ शकत नाही. फर्टिलिटी एक्सपर्ट आणि इंडियन फर्टिलिटी सोसायटीचे मुख्य (ए.पी.चेप्टर) डॉ. रणधीर सिंह यांचे म्हणणे आहे की, यासाठी केवळ महिलेला जबाबदार ठरवू नये. याला पुरुषही जबाबदार असू शकतात.
या समस्येवर आहे उपाय
डॉ. रणधीर सिंह सांगतात की, बहुतेक प्रॉब्लेम्स तात्पुरते असतात आणि याला योग्य औषधौपचाराने पुर्णत: बरा करता येऊ शकतो. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुळ कारणाला समजायला हवे. यानंतर याच्यावर उपचार करणे सोपे होते. तज्ज्ञांच्या मतानुसार महिला आणि पुरुष दोघांशी जुडलेले असेच १० कारण आहेते जे प्रेग्नेंसीला बाधक ठरतात.
१) लठ्ठपणा
लठ्ठपणामुळे पुरु षांमध्ये फिजिकली अॅक्टिव्हिटी कमकुवत होते. शिवाय स्पर्म काउंट देखील कमी होतो. महिलांच्या ओवरीमध्ये चरबी वाढल्याने एग्ज विकसित होत नाहीत त्यामुळे प्रेग्नेंसीला अडथळा येतो.
२) वय
सध्याच्या लाइफस्टाइलच्या कारणाने पुरुषांच्या ३५-४० व्या वर्षीच स्पर्म काउंट कमी होऊ लागतो. शिवाय महिलांमध्ये ४० वयानंतर मेनोपॉज किंवा हार्मोनल प्रॉब्लेम्सच्या कारणाने प्रेग्नेंसीमध्ये अडथळा येतो.
३) संक्रमण
पुरूषांमध्ये युरीन इंफेक्शन किंवा क्षयरोगाच्या कारणाने स्मर्प काउंट कमी होऊ शकतो. तसेच महिलांमध्येही युरीन इंफे क्शन आणि युट्रसमध्ये क्षयरोगाच्या कारणाने फेलोपियन ट्यूब खराब होते.
४) राहणीमान
सिगारेट, मद्यपान, व्यायामाचा अभाव, तंबाखु, लेट नाइट पार्टी आदी कारणाने स्पर्म काउंट कमी होण्यास मदत होते. महिलांमध्येही नशा करणे तसेच अनहेल्दी लाइफस्टाइलच्या कारणाने प्रेग्नेंसीमध्ये अडथळा येतो.
५) ताणतणाव आणि डिप्रेशन
या कारणाने स्पर्म काउंट आणि त्याची गुणवत्ता कमी होते. शिवाय फिजिकल अॅक्टिव्हिटीदेखील प्रभावित होते. ताणतणावामुळे महिलांमध्ये प्रोलेक्टीन नावाचा हार्मोन्स वाढतो, ज्यामुळे प्रेग्नेंसीमध्ये अडथळा येतो.
६) हार्मोनल प्रॉब्लेम्स
थॉयरॉइडसारख्या हार्माेनल प्रॉब्लेम्सच्या कारणाने स्पर्म काउंटवर परिणाम होतो. महिलांमध्ये थॉयराइड तसेच पी.सी.ओ.एस.सारख्या हार्मोनल प्रॉब्लेम्सच्या कारणाने मासिक पाळी डिस्टर्ब होते, शिवाय एग्ज प्रोडक्शनवरही परिणाम होतो.
७) औषधांचा साइड इफेक्ट
जास्त गरम औषधांच्या कारणाने पुरुषात स्पर्म काउंट आणि गुणवत्ता कमकुवत होते. शिवाय महिलांमध्येही मासिक पाळी डिस्टर्ब होते आणि एग्जची गुणवत्ताही कमकुवत होते.
८) मधुमेह
मधुमेहाच्या कारणाने ५० टक्के र्स्पम काउंट कमी होऊ शकतो, तसेच महिलांमध्ये एग्ज प्रोडक्शनवर फरक पडतो आणि मासिक पाळी मिस होते.
९) प्रोफेशन(व्यवसाय)
नाईट शिफ्ट, जास्त उष्ण ठिकाणी काम करणे, ताणतणावाचे काम, जास्त घट्ट अंडरवियर आदी कारणाने स्पर्म काउंट कमी होतात. महिलांनावरही जास्त ताणतणावाच्या कामाचा परिणाम होऊन फिजिकल परफॉर्मंस आणि प्रेग्नेंसीच्या समस्या निर्माण होतात.
१०) आजारपण
लहानपणाच्या एका ठराविक शारीरिक व्याधीमुळे स्पर्मची निर्मिती होणे बंद होते. हायड्रोसील, हार्नियासारखे आजारदेखील स्पर्मची निर्मितीला अथडळा आणतात. युट्रेससंबंधीत आजारपण, कॅन्सर, व्हेजाइनल इन्फेक्शनच्या कारणाने महिलांमध्ये प्रेग्नेंसीला अथडळा येतो.