Health Alert : ​स्मर्प डोनरकडे जाताय? त्यापुर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2017 06:16 AM2017-06-15T06:16:23+5:302017-06-15T11:46:23+5:30

आपली समस्या सोडविण्यासाठी एखाद्या स्पर्म डोनेशन सेंटरमध्ये जात असाल तर काही विशेष गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Health Alert: Smarrup Go to Donor? Pay attention to these things before that! | Health Alert : ​स्मर्प डोनरकडे जाताय? त्यापुर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या !

Health Alert : ​स्मर्प डोनरकडे जाताय? त्यापुर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या !

googlenewsNext
ong>- Ravindra More
आज भारतात स्पर्म डोनेशनची पद्धत रुढ होत आहे, मात्र यामागे बॉलिवूडचा चित्रपट ‘विक्की डोनर’ नव्हे, तर लोकांमध्ये निर्माण होणारी इनफर्टिलिटीची समस्या आहे. करिअर बनविण्याच्या प्रयत्नात उशिरा लग्न करणे, दांपत्याकडे एकमेकांसाठी वेळ नसणे आणि प्रजनन समस्या असणे ही कारणे स्पर्म डोनेशनला प्रोत्साहित करीत आहे. 

स्पर्म डोनेशन एक अशी पद्धत आहे, ज्याद्वारे एक पुरुष आपले शुक्राणु अशा दांपत्यांना दान करते ज्यांना बाळ होण्यास समस्या आहे. 
एक हेल्दी स्पर्म, त्या महिलांना गर्भवती बनविण्यास मदतगार ठरतात ज्या महिलांची आई बनण्याची इच्छा संपलेली असते. ज्या कपल्सला स्पर्मची आवश्यकता असते ते स्पर्म बॅँकेत जाऊन डोनरचे सर्व जुने हेल्थ रेकॉर्ड पाहून स्पर्म घेऊ शकतात. या डोनर रेकॉर्डमध्ये स्पर्म देणाºया व्यक्तीचे नाव नसते, मात्र तो काय करतो, त्यांची उंची, रंग, वजन, शिक्षण आणि जातीच्या बाबतीत सर्व माहिती लिहिलेली असते.  

काही असेही प्रकरणे पाहण्यास मिळाले जे आई आणि बाळासाठी अस्वस्थ करणारे होते. संक्रमित किंवा क्षतिग्रस्त शुक्राणुंमुळे आई आणि बाळ दोघांनाही घातक ठरणारे असतात. यासाठी आपण आपली समस्या सोडविण्यासाठी एखाद्या स्पर्म डोनेशन सेंटरमध्ये जात असाल तर काही विशेष गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 

* कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्याल?
- डॉक्टरांचा सल्ला 
एखाद्या स्पर्म डोनेशन सेंटरमध्ये जाण्याअगोदर सर्वप्रथम आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जो पर्यंत डॉक्टर आपणास असे सांगत नाही की, आपल्या पार्टनरमध्ये लो स्पर्म काउंट किंवा तो एखाद्या आजारोन त्रस्त आहे, तोपर्यंत निर्णय घेऊ नका. 

- योग्य स्पर्म बॅँकेची निवड 
कधीही एखाद्या वृत्तपत्रामधील किंवा होर्डिंगवर दिलेल्या जाहीरातींना बळी पडून स्पर्म बॅँकेत जाण्याची घाई करू नये. एक अधिकृत आणि स्वच्छ स्पर्म बॅँक च चांगल्या गुणवत्तेचे स्पर्म देण्याचा दावा करु शकते. सोबतच फर्टिलायलेशन नेहमी प्रमाणित प्रोफेशनलद्वाराच केले जाते याची देखील खात्री करावी. जे स्पर्म बॅँक प्रमाणित असतील असेच बॅँक कपल्ससाठी चांगले असतात. 
  
- डोनरचा रेकॉर्ड चांगल्याप्रकारे तपासा
जेव्हा आपण स्पर्म डोनरसाठी जाणार तेव्हा डोनरचा रेकॉर्ड तपासण्याचे अजिबात विसरु नका. प्रत्येक स्पर्म बॅँकेजवळ डोनरची संपूर्ण माहिती असते. याशिवाय डोनरच्या शरीराची संपूर्ण तपासणी केलेली असते. त्यात तो अन्य किंवा एखाद्या लैंगिक आजाराने ग्रस्त तर नाही. याव्यतिरिक्त या रेकॉर्डमध्ये डोनरच्या आई-वडिलांची कौटुंबिक माहितीदेखील दिलेली असते. 

- आरएच कम्पॅटिबिलिटी 
बऱ्याच लोकांना याबाबतीत माहिती नसेल की, प्रेग्नंसीसाठी ब्लड ग्रुपचीही मोठी भूमिका असते. आपल्या रक्तात आरएच किंवा रिसस फॅक्टर असतो जो एक एंटिजन म्हणजेच एक प्रकारचे प्रोटीन असते. जेव्हा एक निगेटिव्ह ब्लड ग्रुप या आरएच फॅक्टरच्या संपर्कात येतो तेव्हा त्याची इम्यूनिटी सिस्टम अ‍ॅन्टिबॉडी निर्माण करते, जी त्याच्या विरोधात लढू लागते आणि यामुळेच मिसकॅरेज होते. यासाठी स्पर्म डोनरच्या ब्लड ग्रुपकडेही लक्ष द्यावे. 

Also Read : ​HEALTH : आपणास वडील व्हायचयं का? तर वापरा या १० वस्तू !
 

Web Title: Health Alert: Smarrup Go to Donor? Pay attention to these things before that!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.