Health Alert : ‘या’ ८ पदार्थांपासून पुरुषांनी दूरच राहावे, अन्यथा !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2017 03:14 PM2017-06-07T15:14:43+5:302017-06-07T20:44:43+5:30
अशा खाद्य पदार्थांचे सेवन पुरूषांनी विचारपुर्वकच करावे. चला जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे पुरुषांना कमजोर बनवितात.
Next
आपण काय आहार घेतो यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण होत असते. विशेष म्हणजे कोणत्या परिस्थितीत काय खावे आणि काय खाऊ नये याचेदेखील एक सुत्र असते, मात्र हे बऱ्याचजणांना माहित नसते. आपण जे काही खातो त्या खाद्य पदार्थांमध्ये काही पदार्थ आपल्याला ऊर्जा देतात मात्र असेही काही पदार्थ आहेत जे आपल्याला कमजोर बनवितात.
हॉवर्ड यूनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासात वैज्ञानिकांनी असे काही खाद्य पदार्थांच्या बाबतीत सांगितले आहे, जे पुरुषांसाठी सेवन करणे अयोग्य आहेत. अशा खाद्य पदार्थांचे सेवन पुरूषांनी विचारपुर्वकच करावे. चला जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे पुरुषांना कमजोर बनवितात.
* प्रोसेस्ड फूड
सध्या प्रोसेस्ड फूड म्हणजेच डेअरी प्रोडक्ट्स वापरण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. या पदार्थात आढळणारे पाश्चराइड दूध, दही, लोणी आदीच्या अधिक सेवनाने पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
* सोया प्रोडक्ट
सोया पासून बनविलेल्या खाद्य पदार्थांमध्ये आयसोफलेवोन फायटोएस्ट्रोजन असते, ज्यामुळे पुरुषांच्या सेक्स हार्मोन्सवर प्रभाव पडतो. याच्या अधिक सेवनाने शुक्राणूंची संख्या कमी होते.
* अल्कोहोल
नॅशनल इंस्टिट्यूट आॅफ हेल्थच्या संशोधनानुसार अति प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्याने पुरुषांत प्रजनन क्षमता प्रभावित होते, ज्यामुळे नपुंसकता येऊ शकते.
* डबाबंद फूड
सध्या लोकांना बाजारा विकत मिळणारे डबाबंद फूडचे सेवन करण्याची सवय लागली आहे. मात्र हे फूड पुरुषांच्या आरोग्यासाठी हानिकारक मानण्यात आले आहे.
* कॉफी
थकवा दूर करण्यासाठी आपण कॉफीचे सेवन करीत असतो. मात्र याच्या अति सेवनाने पुरुषांत नपुसंकता येऊ शकते. यातील कॅफीनमुळे शुक्राणूंची संख्या कमी होते.
* चहापत्ती आणि लव्हेंडरचे तेल
चहापत्ती आणि लव्हेंडर तेलच्या वापराने पुरुषांची ब्रेस्ट महिलांच्या ब्रेस्ट सारखी होते, असे संशोधनात आढळून आले आहे.
* रिफाइंड शुगर
संशोधनानुसार रिफाइंड शुगरमध्ये अॅन्टि कॅलरीज असते जी पुरुषांच्या शरीराला फायद्याऐवजी पोटाची चरबी आणि वजन वाढविण्याचे काम करते.
* पुदीना
पुदीनामध्ये मेंथॉल असते. ज्याच्या अधिक सेवनाने पुरुषांत सेक्युअल परफॉर्मस् कमी होतो.