Health Alert : ​‘या’ कारणांनी होते किडनी फेल !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2017 09:48 AM2017-06-02T09:48:55+5:302017-06-02T15:18:55+5:30

किडनी फेल होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून ही समस्या गंभीर होत चालली आहे.

Health Alert: 'These' causes kidney failure! | Health Alert : ​‘या’ कारणांनी होते किडनी फेल !

Health Alert : ​‘या’ कारणांनी होते किडनी फेल !

googlenewsNext
डनी फेल होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून ही समस्या गंभीर होत चालली आहे. या समस्येला ‘अँड स्टेज रीनल डिसिज’ असे म्हणतात. किडनी फेल्यूअर म्हणजे दोन्ही किडनींनी काम करणे बंद करणे होय. आपल्या शरीरामध्ये दोन किडन्या असतात. यांचे मुख्य काम ब्लड फिल्टर करुन टॉक्सिन्स वेगळे करणे असते. हे टॉक्सिन्स यूरिनच्या माध्यमातून बाहेर पडतात. ज्यावेळी एखाद्या कारणामुळे किडन्यांची ब्लड फिल्टर करण्याची आणि वेस्ट मटेरियल काढण्याची क्षमता संपते, त्याला किडनी फेल्यूअर म्हटले जाते. आता मात्र डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटशिवाय जास्त दिवस जिवंतही राहता येत नाही. 

- कोणत्या कारणांनी होते किडनी फेल?
* अति प्रमाणात धुम्रपान आणि मद्यपान केल्यास त्याद्वारे शरीरात टॉक्सिन्स वाढतात. किडनी या टॉक्सिन्सला फिल्टर करू शकत नाही, त्यामुळे किडनी फेल होऊ शकते. 

* मिठाच्या जास्त सेवनाने रक्तदाब वाढतो. यामुळे कि डनीवर दबाव वाढल्याने फेल होण्याची शक्यता असते. 

* ताण-तणावामुळे शरीरात निर्माण होणारे हार्माेन्स किडनीला नुकसान पोहचवितात, त्यामुळे किडनी फेल होण्याची शक्यता वाढते. 

* रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याने किडनीवर फिल्टर करण्याचा लोड वाढतो, यामुळे किडनी फेल होऊ शकते.

- किडनी फेल होण्याचे हे आहेत संकेत
* लघवी करताना रक्त येणे, त्रास होणे, जास्त लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे, फेसळ लघवी येणे शिवाय टॉक्सिन्स व्यवस्थित फिल्टर होत नसल्याने आणि पाणी जमा झाल्याने शरीरात सूज निर्माण होते. याव्यतिरिक्त रक्तामध्ये युरियाचे प्रमाण वाढल्याने त्वचेचे विकार, तोंडाची दुर्गंधी, उलटी होण्याची जाणिव अशा समस्या निर्माण होतात. याचबरोबर शरीरात टॉक्सिन्स वाढल्याने हाडे व जॉर्इंट पेन होऊ शकते. तसेच किडनी फेल झाल्याने ब्लडमध्ये आॅक्सिजनचा सप्लाय पुरेसा होत नाही त्यामुळे थकवा आणि कमजोरी येऊ शकते. 

- किडनी फेल होण्यापासून कशी काळजी घ्याल?
* संतुलित आहार घेतल्यास किडनी हेल्दी राहण्यास मदत होते.

* मद्यपान, धुम्रपान, जंकफूड यापासून चार हात लांब राहा, यामुळे शरीरात टॉक्सिन्स जमा होणार नाहीत.

* भरपूर पाणी पिल्याने शरीरातील टॉक्सिन्स फिल्टर होऊन बाहेर निघत राहतात आणि किडनी हेल्दी राहते. 

* आहारामध्ये मीठ आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवल्यास रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. यामुळे किडनीवर दबाव पडत नाही आणि किडनी हेल्दी राहते. 

* नियमित किमान अर्धा तास व्यायाम केल्यास रक्ताभिसरण प्रक्रिया उत्तम राहते, यामुळे किडनी हेल्दी राहण्यास मदत होते. 


Web Title: Health Alert: 'These' causes kidney failure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.