Health Alert : कलिंगड खाल्ल्यानंतर का पाणी पिऊ नये !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2017 11:12 AM2017-04-29T11:12:53+5:302017-04-29T16:42:53+5:30

बऱ्याचजणांना कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते. ही सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

Health Alert: Why should not drink water after eating kalangad! | Health Alert : कलिंगड खाल्ल्यानंतर का पाणी पिऊ नये !

Health Alert : कलिंगड खाल्ल्यानंतर का पाणी पिऊ नये !

googlenewsNext
ong>-Ravindra More
उन्हाळ्यात बरेचजण शरीराला गारवा मिळण्यासाठी कलिंगड खातात. तसे उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन फायदेशीर मानले जाते, कारण याने आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण वाढवतं. मात्र बऱ्याचजणांना कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते. ही सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. 
कलिंगडामध्ये सुमारे ९२ ते ९६ टक्के पाण्याचं प्रमाण असते, त्यामुळे अगोदरच पाण्याचं एवढं प्रमाण असताना त्यावर आणखी पाणी प्याल तर पोटाच्या तक्रारी वाढू शकतात. अन्न खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिल्यास पोटात पाण्याचं अन्नासोबत मिश्रण होतं. शिवाय अन्न चांगल्या प्रकारे पचनही होत नाही.
अन्नासोबत जास्त पाणी पिल्यास शरीरात जास्त प्रमाणात अ‍ॅसिड तयार होईल आणि पोट भरल्यासारखं वाटेल. त्यामुळे जेवणासोबत जास्त पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो.
मात्र अनेक फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे फळं खाल्ल्यानंतर पाणी पिणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. फळं खाल्ल्यानंतर जास्त पाणी पिल्यास तुम्हाला जठरासंबंधी समस्या जाणवू शकतात.
पाण्याचं प्रमाण जास्त असणाऱ्या फळांवर पाणी पिल्यास कॉलरा होऊ शकतो. मात्र फळ इंफेक्टेड असेल, तरच असं होऊ शकतं, असं डॉक्टर सांगतात.
अन्न किंवा फळांवर जास्त पाणी पिल्यावर पोटात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड तयार होतं. ज्यामुळे अन्न पचन होण्याऐवजी अन्न आणि पाण्याचं मिश्रण होतं.
उदाहरणार्थ दोन चपात्या घेतल्या आणि त्यावर एक ग्लास पाणी टाकलं. चपाती पाण्यात मिसळून जाईल, मात्र त्याचं व्यवस्थितपणे मिश्रण होणार नाही आणि ते खराब होईल. तसंच पोटाच्या बाबतीतही होतं, जेव्हा आपण जेवणानंतर पाणी पितो, असं उदाहरण डॉक्टर देतात.
जेवणानंतर थोडं थांबून पाणी पिऊ शकतो, कारण पोटाला पचन करण्यासाठी थोडासा वेळ लागतो.
फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणून कुणीही ते खाऊ शकत नाही. किडनीचे रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण आणि हदयाचा आजार ज्यांना असेल, त्यांनी हे फळं खाणं टाळावं, असं डॉक्टर सांगतात.

Also Read :  ​Health Alert : उन्हाळ्यात टरबूज खाण्यापूर्वी असे तपासा, नाहीतर पडाल आजारी !
                   : HEALTH ALERT :...यानंतर कलिंगड खाल्ले तर आरोग्याला बाधक !               

Web Title: Health Alert: Why should not drink water after eating kalangad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.