Health Alert : सतत माउसचा वापर करुन मनगटात त्रास होतोय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2017 07:10 AM2017-05-24T07:10:09+5:302017-05-24T12:40:09+5:30

आॅफिसमध्ये सतत माउसचा वापर करुन आपल्याही मनगटात त्रास होत असेल तर वेळीच सतर्क व्हायला हवे.

Health Alert: Is the wrinkle using a continuous mouse? | Health Alert : सतत माउसचा वापर करुन मनगटात त्रास होतोय का?

Health Alert : सतत माउसचा वापर करुन मनगटात त्रास होतोय का?

Next
फिसमध्ये सतत माउसचा वापर करुन आपल्याही मनगटात त्रास होत असेल तर वेळीच सतर्क व्हायला हवे. सतत माउसच्या वापराने हाताचे मनगट आणि बोटांमध्ये कायमचा दुखण्याचा त्रास निर्माण होऊ शकतो जो भविष्यात अधिक घातक ठरू शकतो. याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात कार्पल टनल सिंड्रोमची समस्या उद्भवू शकते. 

* काय आहे कार्पल टनल सिंड्रोम?
कार्पल टनल सिंड्रोम (सीटीएस) हा हातांमध्ये होणारा एक विकार आहे जो मनगटातून जाणाऱ्या नसांवर दबाव पडल्याने होतो. याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. काही विशिष्ट प्रकारचे योग केल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. 

कोणते योग कराल?
* विरुद्ध प्रार्थना
यात आपल्या पाठीच्या बाजूने आपल्या हातांना नमस्कारच्या मुद्रेत ठेवायचे आहे. या मुद्रेत आपल्या हाताना सुमारे २० मिनिटे तसेच ठेवायचे आहे. असे केल्याने खूपच फायदेशीर ठरते. 

* हॅँडकफ
हा योग आपणास आपल्या मनगटाच्या विरुद्ध बाजूचा अंगठा आणि लहान अंगठीला गोलाकार पकडून करायचे आहे. असे करतेवेळी आपण मनगटास पाच मिनिटापर्यंत दाबून ठेवा. याशिवाय आपण अजून एक योग करु शकता. यात आपल्या मनगटास खालील बाजूने झुकवा. जसे आपली बोटं जमिनीकडे इशारा करीत आहेत. त्यानंतर आपल्या उजव्या हाताने डाव्या हाताच्या बाहेरील भागास दाबावे. आपल्या हातात ताण निर्माण होत नाही तो पर्यंत असे करावे. 

* प्रार्थना मुद्रा
प्रार्थना मुद्रेसाठी दोन्ही हात जोडून नमस्कारच्या मुद्रेत बसावे. यादरम्यान दोन्ही हातांवर हलकासा दबाव द्यावा. त्यानंतर आपल्या हातांना दोन्ही मनगटांकडे झुकवावे. आता उजव्या हाताने डाव्या हाताकडे ४५ डिग्रीचा कोन बनविण्यासाठी धक्का द्या. त्यानंतर डाव्या बाजूने उजव्या हाताकडे हे आसन करावे. 

* काय काळजी घ्याल?
* माउस आणि की-बार्डवर काम करतेवेळी मध्यंतरी थांबून काही मिनिटांसाठी ब्रेक घ्यावा. यादरम्यान फक्त मनगटाबरोबरच आपल्या दोन्ही हातांनाही वेगवेगळ्या दिशेत खेचावे. 
* काम करतेवेळी आपला की-बोर्ड योग्य ठिकाणी आहे की, नाही? याचीदेखील काळजी घ्यायला हवी. टायपिंग करतेवेळी आपले मनगट वरच्या बाजूने जास्त वाकलेले नकोत.  

Web Title: Health Alert: Is the wrinkle using a continuous mouse?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.