Health: एचआयव्ही-एड्सवर प्रभावी लस?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 09:16 AM2022-06-20T09:16:09+5:302022-06-20T09:16:26+5:30

Health: अलीकडेच कॅन्सर पूर्णपणे बरा करू शकेल अशा औषधाचा शोध लागल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर आता एचआव्हीग्रस्तांसाठी खूशखबर आहे. एचआयव्ही एड्स पूर्ण बरा होऊ शकेल, अशा प्रकारची लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आल्याचे समजते...

Health: An effective vaccine against HIV-AIDS? | Health: एचआयव्ही-एड्सवर प्रभावी लस?

Health: एचआयव्ही-एड्सवर प्रभावी लस?

googlenewsNext

अलीकडेच कॅन्सर पूर्णपणे बरा करू शकेल अशा औषधाचा शोध लागल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर आता एचआव्हीग्रस्तांसाठी खूशखबर आहे. एचआयव्ही एड्स पूर्ण बरा होऊ शकेल, अशा प्रकारची लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आल्याचे समजते...

कोणी लावला शोध?
-एचआयव्हीवरील लसीचा तेल अविव युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी शोध लावला आहे. 
- या लसीच्या एका डोसच्या माध्यमातूनच
- एचआयव्हीचा विषाणू संपुष्टात येईल, असा संशोधकांचा दावा आहे. 

कशी तयार केली लस?
- शास्त्रज्ञांनी जीन एडिटिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने एचआयव्हीवरील लस तयार केली आहे. 
- सध्या ही लस प्रायोगिक टप्प्यावर असून उंदरांवर तिचा प्रयोग केला जात आहे. 
- लसीमध्ये टाइप बी पांढऱ्या रक्तपेशींचा वापर करण्यात आला आहे. 
- या पेशींमुळे एचआयव्हीशी लढण्यासाठी अँटिबॉडीज विकसित होतात. 
- ही लस रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास बळ देते, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.  

एचआयव्ही एड्सची उत्पत्ती
-ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस असे या विषाणूचे नाव आहे. 
- हा विषाणू २०व्या शतकात चिम्पांझीच्या माध्यमातून माणसाच्या शरीरात शिरल्याचे मानले जाते.

जगभरात एड्सग्रस्त
 एड्सचा पहिला रुग्ण ५ जून १९८१ रोजी अमेरिकेत सापडला होता. 
 चार कोटी लोकांना एड्सची बाधा झाली आहे. 
 निम्म्याहून अधिक एड्सग्रस्त आफ्रिका खंडात आहेत.
 भारतातही २३ लाखांहून अधिक एड्सग्रस्त आहेत. 

एड्सची लक्षणे
nताप येणे
nथकवा जाणवणे
nस्नायू आखडणे
nसांधेदुखी
nडोकेदुखी
nवजन घटणे
nत्वचेचा रंग बदलणे

Web Title: Health: An effective vaccine against HIV-AIDS?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.