ग्रीन टीपेक्षाही लाभदायक ठरतो निळा चहा; जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 07:07 PM2018-12-27T19:07:08+5:302018-12-27T19:09:18+5:30

सध्या लोकांमध्ये हर्बल टीची क्रेझ वाढताना दिसत आहे. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात तसेच अनेक औषधी गुणधर्मही असतात. जे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत करतात.

Health and beauty benefits of blue tea | ग्रीन टीपेक्षाही लाभदायक ठरतो निळा चहा; जाणून घ्या फायदे

ग्रीन टीपेक्षाही लाभदायक ठरतो निळा चहा; जाणून घ्या फायदे

googlenewsNext

सध्या लोकांमध्ये हर्बल टीची क्रेझ वाढताना दिसत आहे. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात तसेच अनेक औषधी गुणधर्मही असतात. जे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. बाजारामध्ये वेगवेगळ्या ब्रँड्सचे हर्बल टी उपलब्ध असतात. या सर्व हर्बल टीमध्ये ग्रीन टी आणि ब्लॅक टी लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. परंतु चहा इतरही अनेक रंगांमध्ये असते. जशी व्हाइट आणि येलो टी. हे चहा वेगवेगळ्या फुलांच्या अर्कापासून तयार करण्यात येतात. यामध्ये एक निळा चहा असतो त्याला 'ब्ल्यू टी' म्हणून ओळखलं जातं. ग्रीन टीपेक्षाही हा चहा शरीरासाठी फायदेशीर असतो. 

बटरफ्लाय पी फ्लॉवरपासून तयार होतो 'ब्ल्यू टी' 

दिसायला सुंदर आणि आरोग्यदायी असणारा हा चहा 'ब्ल्यू टी' किंवा 'बटरफ्लाय टी' म्हणूनही ओळखला जातो. कारण हा चहा बटरफ्लाय पी फ्लावरपासून तयार करण्यात येतो. या फुलाला 'अपराजिताचं फूल' असंही म्हणतात. 

चहा तयार करण्याची पद्धत 

ब्ल्यू टी तुम्ही घरीही अगदी सहज तयार करू शकता. एक कप पाणी गरम करून त्यामध्ये 3 ते 5 अपराजिताचं फूल टाका आणि व्यवस्थित उकळून घ्या. चहा थोडा गोड हवा असेल तर यामध्ये थोडी साखर एकत्र करू शकता. उन्हाळ्यात तुम्ही आइस टी म्हणूनही घेऊ शकता. 

निळ्या चहाचे आरोग्यदायी फायदे :

बॉडी डिटॉक्स करण्यासाठी

निळ्य चहामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टीऑक्सिडंट असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर यामध्ये बायोकपाउंड तत्वही आढळून येतात. जे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. 

डायबिटीजपासून सुटका

तुम्हाला डायबिटीज असेल तर या चहाचा एक कप तुमचं डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. 

मायग्रेन

जर टेन्शनमुळे तुम्हाला डोकेदुखीची समस्या उद्भवत असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी निळ्या चहाचे सेवन करा. सामान्य डोकेदुखी आणि थकवा दूर करण्यासाठी याचे सेवन करा. 

डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी

डोळ्यांचा थकवा, सूज आणि रॅटीना पॉवर वाढविण्यासाठी निळा चहा फायदेशीर ठरतो. याव्यतिरिक्त चेहऱ्यावरील पांढरे डाग दूर करण्यासाठी हा चहा लाभदायक ठरतो. 

केसांच्या समस्यांवर उपाय म्हणून

जर तुम्हाला केस गळण्याच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर आजपासूनच या चहाचे सेवन करणं सुरू करा. त्यामुळे केसांच्या इतरही समस्या दूर होण्यास मदत होते. 

Web Title: Health and beauty benefits of blue tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.