बाबो! चॉकलेट खाणाऱ्यांनो सावधान; आरोग्यासाठी ठरतंय घातक, रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 04:36 PM2024-08-05T16:36:38+5:302024-08-05T16:38:45+5:30

चॉकलेट खायला आवडत असेल तर आताच सावध व्हा कारण तुमच्यासाठी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

health and food toxic heavy metals in dark chocolate products know side effects | बाबो! चॉकलेट खाणाऱ्यांनो सावधान; आरोग्यासाठी ठरतंय घातक, रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

बाबो! चॉकलेट खाणाऱ्यांनो सावधान; आरोग्यासाठी ठरतंय घातक, रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

तुम्हालाही चॉकलेट खायला आवडत असेल तर आताच सावध व्हा कारण तुमच्यासाठी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांना एका रिसर्चमध्ये अनेक चॉकलेट उत्पादनांमध्ये टॉक्सिक हेवी मेटल्स (Heavy Metals) आढळून आले आहेत, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आणि धोकादायक असू शकतात.

न्यूयॉर्क पोस्टने रिपोर्ट दिला आहे की, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीने केलेल्या रिसर्चमध्ये अनेक चॉकलेट उत्पादनांमध्ये टॉक्सिक हेवी मेटल्सचं प्रमाण आणि कॅडमियम आढळून आलं आहे, जे आरोग्यास गंभीर हानी पोहोचवू शकतात. या रिसर्चमध्ये आणखी काय समोर आलं आहे ते जाणून घेऊया...

या रिसर्चमध्ये शास्त्रज्ञांनी आठ वर्षे कोकोपासून बनवलेल्या डार्क चॉकलेटसह ७२ प्रोडक्ट्सचं विश्लेषण केलं. त्यानंतर त्यांना असं आढळून आलं की चॉकलेटपासून बनवलेल्या ४३ टक्के उत्पादनांमध्ये टॉक्सिक हेवी मेटल्स आहे. ३५ टक्के उत्पादनांमध्ये कॅडमियम आढळलं. त्याच वेळी, ऑर्गेनिक प्रोडक्टमध्ये टॉक्सिक मेटल्सचं मोठ्या प्रमाणात आढळतात, जे चिंतेचं कारण आहे.

चॉकलेट आरोग्यासाठी ठरतंय हानिकारक

संशोधकांनी सांगितलं की, चॉकलेट प्रोडक्ट्समध्ये मेटल्स कंटामिनेशन हे मॅन्यूफॅक्चरिंग दरम्यान होऊ शकतं. हा रिसर्च वेगवेगळे ब्रँड आणि चॉकलेटच्या प्रकारांवर आधारित होता. अनेक प्रकरणांमध्ये, टॉक्सिक हेवी मेटल्सचं प्रमाण खूप जास्त आढळलं. हा अत्यंत विषारी घटक आहे जो शरीरात जमा झाल्यास मज्जासंस्था, किडनी आणि हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मुलांच्या शरीरात पोहोचल्याने त्याचा मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. 

आरोग्यावर कॅडमियमचा प्रभाव

चॉकलेटमध्ये आढळणारा आणखी एक टॉक्सिक मेटल कॅडमियम आहे. कॅडमियम किडनी आणि हाडांसाठी हानिकारक आहे. शरीर याच्या संपर्क राहिल्यास हाडं कमकुवत होऊ शकतात. याशिवाय किडनीचे अनेक आजार होऊ शकतात. संशोधकांनी सांगितले की कोकोची झाडे जमिनीतून हेवी मेटल्स शोषून घेतात, त्यामुळे जास्त चॉकलेट खाणे टाळावं. त्याचे तोटेही मुलांना सांगितले पाहिजेत.
 

Web Title: health and food toxic heavy metals in dark chocolate products know side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.