HEALTH : ​प्रवासात मळमळ/ओकारी होतेय? या समस्येवर "हे" आहेत प्रभावी उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2017 10:32 AM2017-04-26T10:32:03+5:302017-04-26T16:02:03+5:30

बऱ्याचजणांना प्रवासादरम्यान मळमळ किंवा ओकारी होते. अशावेळी लाजिरवाणा प्रसंग ओढवला जातो. हा प्रसंग आपल्यावर येऊ नये म्हणून करा हे उपाय !

HEALTH: Are nauseous on travel? Effective solutions are "this" on this issue! | HEALTH : ​प्रवासात मळमळ/ओकारी होतेय? या समस्येवर "हे" आहेत प्रभावी उपाय !

HEALTH : ​प्रवासात मळमळ/ओकारी होतेय? या समस्येवर "हे" आहेत प्रभावी उपाय !

Next
ong>-Ravindra More
सध्या शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागल्या आहेत शिवाय लग्नसराईचेपण दिवस आहेत. अशातच प्रवास होणे स्वाभाविकच आहे. बऱ्याचजणांना प्रवासादरम्यान मळमळ किंवा ओकारी होते. अशावेळी लाजिरवाणा प्रसंग ओढवला जातो, तर बहुतेकजण या समस्येच्या कारणाने प्रवासच करणे टाळतात. आज आम्ही आपणास प्रवासात होणारी मळमळ आणि ओकारी ही कशी थांबवता येऊ शकते, याबाबत काही टिप्स देत आहोत. 

* मळमळ आणि ओकारीवर लिंबू अतिशय प्रभावी उपाय आहे. हजारो वर्षापासून लिंबूचा उपयोग यासाठी केला जात आहे. यासाठी प्रवासाला जाताना आपल्यासोबत लिंबू असावाच. जेव्हा मळमळ वाटेल तेव्हा तो लिंबू शिलून घ्या आणि त्याचा वास घ्या. त्याने मळमळ थांबते. 

* मिरे हे देखील ओकारीवर गुणकारी आहे. लिंबू त्यावर मिरे पावडर आणि काळं मीठ टाकून हे चाटल्यास आराम मिळतो. प्रवासात तुम्ही मध्ये मध्ये हे चाटल्यास आराम मिळतो.

* लवंगदेखील यावर प्रभावी उपाय आहे. मात्र लवंग जर कुटलेली असेल तर अति उत्तम. जेव्हाही आपणास हा त्रास जाणवेल तेव्हा कुटलेली एक चिमटा लवंग साखर किंवा काळ्या मिठासोबत खाल्ली की आराम मिळतो. यासोबतच तुळशीच्या पानासोबतही लवंग खाता येऊ शकते.

* पुदिना हा खूप गुणकारी आहे. जेव्हा प्रवासात असाल तेव्हा एका बॉटलमध्ये लिंबू आणि पुदिन्याचा रस भरून सोबत ठेवा. त्यात काळ मिठंही तुम्ही टाकू शकता. प्रवासात हा रस थोडा थोडा पिल्यानं आराम मिळतो.

* आलं टाकलेला चहा पिणं हा देखील प्रवासातील एक उपाय मानला जातो. आल्यामध्ये अ‍ॅन्टी एमेटिक तत्व असतात त्यामुळे आल्याचं प्रवासात सेवन केल्यास ओकारी आणि मळमळीपासून आराम मिळतो.  

* वेलचीनेही प्रवासात खूप आराम मिळतो. प्रवासात जाण्याच्या आधीही तुम्ही वेलचीचा वापर करू शकता. प्रवासात जाण्याच्या आधी वेलची टाकलेला चहा पिल्यास प्रवास आरामात होतो. 

* जलजीरा हे ओकारीवर गुणकाही आहे. तसंच ते शरीराला थंडावाही देतो. पाण्यामध्ये जी-याची पुड टाकून पिल्यास मळमळ थांबते.

Web Title: HEALTH: Are nauseous on travel? Effective solutions are "this" on this issue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.