HEALTH : उन्हाळ्यात घामाने त्रस्त आहात? वापरा हे घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2017 10:12 AM2017-04-14T10:12:24+5:302017-04-14T15:42:24+5:30

वेळीच लक्ष दिले नाही तर ही समस्या रुद्र रुप धारण करु शकते. मात्र काही घरगुती उपाय करुन ही समस्या आपण दूर करु शकतो.

HEALTH: Are you sweated in the summer? Use home remedies! | HEALTH : उन्हाळ्यात घामाने त्रस्त आहात? वापरा हे घरगुती उपाय !

HEALTH : उन्हाळ्यात घामाने त्रस्त आहात? वापरा हे घरगुती उपाय !

Next
ong>-Ravindra More
हा कडक उन्हाळ्यात शरीरातून निघणाऱ्या घामामुळे आपणास डिहायड्रेशनची समस्याही उद्भवू शकते. वेळीच लक्ष दिले नाही तर ही समस्या रुद्र रुप धारण करु शकते. मात्र काही घरगुती उपाय करुन ही समस्या आपण दूर करु शकतो. 

काय कराल घरगुती उपाय
* तळव्यांना येणारा घाम थांबविण्यासाठी टबमध्ये दोन चमच तुरटीचे पावडर टाकून त्यात दोन मिनिटापर्यंत पायांना डुबवून ठेवा. 

* उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ, अल्कोहोल आणि कॅफिनसारख्या वस्तूंचा प्रयोग जास्त करु नका. या पदार्थांमुळे घामाचे छिद्रे मोकळे होतात. 

* मूगाला थोडे भाजून त्यात एक चमच कच्चे दूध मिक्स करु न पेस्ट तयार करा. कमीत कमी १५ दिवस ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. असे केल्याने मूग आपल्या चेहऱ्याच्या ओलाव्याला कोरडे करेल आणि घाम येणे बंद होईल. 

* या दिवसात मीठाचा वापर कमी करावा. 

* शारीरिक स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष द्या. सतत घाम येणारी जागा ओली राहील्याने त्याठिकाणी बॅक्टेरिया तयार होतात, ज्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. 

* अ‍ॅण्टी फंगल पावडर लावल्यानंतर मोजे आणि बूट घाला. मोज्याशिवाय बूट अजिबात घालू नका. 

* काकडीचा रस चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होईपर्यंत राहू द्या.

* घाम येणाऱ्या जागेवर बर्फ घासा.

* अ‍ॅण्टी बॅक्टेरियल साबनाचाच वापर करा. 

Web Title: HEALTH: Are you sweated in the summer? Use home remedies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.