HEALTH : दम्यावर ‘अद्रक’ गुणकारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2017 01:02 PM2017-03-19T13:02:00+5:302017-03-19T18:32:00+5:30
दम्याच्या त्रासाने अनेक जण त्रस्त असून बऱ्याच उपायांनीदेखील या त्रासापासून सुटका होत नाही. मात्र दम्यावर अद्रकचा वापर करुन या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
Next
काय उपाय कराल?
* अद्रक व लसूण दोन्ही दम्यासाठी गुणकारी आहेत. दम्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत ३० मिली दुधात लसणाच्या पाच कळ्या उकळून हे मिश्रण दररोज घेतल्याने लाभ होतो. याशिवाय आल्याच्या गरम चहात लसणाच्या दोन कळ्या मिसळून सकाळ-संध्याकाळ घेतल्याने दम्यावर नियंत्रण मिळवता येते.
* आल्याच्या रसात मध मिसळून चाटण घेतल्याने सर्दी, खोकला नाहीसा होतो.
* कांद्याचा रस, आल्याचा रस व तुळशीच्या पानांचा रस मधात मिसळून सकाळ-संध्याकाळ घेतल्याने दमा नष्ट होतो.
* एक ग्रॅम आल्याचा रस एक चमचा पाण्यात मिसळून सकाळ-संध्याकाळ घेतल्याने दमा व श्वसनसंबंधित रोग नाहीसे होतात.
* पिंपळी व सैंधव मीठ कुटून चूर्ण बनवा. यामध्ये आल्याचा रस मिसळून रात्री झोपण्यापूर्वी घ्या. यामुळे दमा, खोकला व कफ नष्ट होतो.
* आल्याच्या पाकात तेजपान व पिंपळीचे चूर्ण मिसळून चाटण घेतल्याने श्वासनलिकेत साठलेला कफ निघून जातो व दम्याचा त्रास कमी होतो.