HEALTH : ​बाळंतपणानंतरच्या "या" गोष्टी जाणून व्हाल चकित !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2017 11:02 AM2017-06-01T11:02:40+5:302017-06-01T16:32:40+5:30

बाळंतपरानंतर अशा काही गोष्टी आहेत ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा मातृत्वाचा आनंद गमावला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत.

HEALTH: Astrophenies Will Be Knowing "These" Things After Birthday! | HEALTH : ​बाळंतपणानंतरच्या "या" गोष्टी जाणून व्हाल चकित !

HEALTH : ​बाळंतपणानंतरच्या "या" गोष्टी जाणून व्हाल चकित !

Next
ong>-Ravindra More
बाळाच्या जन्माबरोबरच एका आईचाही जन्म होत असतो. विशेष म्हणजे एका महिलेसाठी आई होणे ही बाब  जन्माला सार्थक आल्यासारखे असते. बाळ जन्माला आल्यानंतर सर्वांकडून आईला शुभेच्छा दिल्या जातात. याप्रसंगी सर्व प्रसुती वेदना विसरुन ती आई आनंदात अगदी डुंबून जात असते. मात्र बाळंतपरानंतर अशा काही गोष्टी आहेत ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा मातृत्वाचा आनंद गमावला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत. 

* सेक्सची इच्छा कमी होते
 नैसर्गिक डिलीवरी किंवा सिझेरियन डिलीवरी असो बाळंतपणानंतर तुमची सेक्स ची इच्छा कमी होते. काही महिला काही दिवस, काही आठवडे तर काही महिने सेक्स करत नाहीत. तर काहीजणींना बाळंतपणानंतर दोन वर्ष सेक्स करण्याची इच्छा होत नाही.

* झोपेवर होतो परिणाम 
बाळासाठी आपल्याला रात्रभर जागरण करावे लागत असल्याने आपली पुरेशी झोप होत नाही. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ न आपणास अस्वस्थ वाटू लागते.

* पुन्हा गरोदर असल्यासारखे दिसणे 
बाळंतपणानंतर देखील काही दिवस तुमचे पोट गरोदरपणाप्रमाणेच वाढलेले दिसते.

* डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स येणे 
बाळामुळे रात्रभर जागरण करणे, त्याला सांभाळल्यामुळे आलेला थकवा यामुळे डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स येणे स्वाभाविक आहे. 

* स्ट्रेचमार्कमुळे शरीराची विद्रुपता वाढणे 
बाळंतपणानंतर पोटावर येणाऱ्या स्ट्रेचमार्क्समुळे शरीरावर विद्रुपता येऊन आपल्याच शरीराची आपणास लाज वाटू लागते.   

* बाळंतपणानंतरचा रक्तस्त्राव मासिक पाळीपेक्षा वेदनादायी
प्रसूतीनंतर होणाऱ्या रक्तस्त्रावाला Lichia असे म्हणतात. मात्र हा त्रास मासिक पाळीपेक्षाही भयानक असतो. तसेच हा त्रास पाच दिवसांनंतरही लगेच थांबत नाही.

* स्तनांची संवेदनशीलता वाढते 
 बाळंतपणानंतर होणाऱ्या शारीरिक बदलामुळे स्तनांची संवेदनशीलता वाढते. त्यामुळे केवळ स्तनपान करतानाच नव्हे तर इतर कोणत्याही स्पशार्मुळे तुमच्या स्तनांना त्रास होतो. 

* स्वभावात घडतो बदल 
बाळंतपणानंतर भावनिक विस्फोट व रडू येणे थांबवता येत नाही. बाळंतपणानंतर होणारा मूड स्वींगचा त्रास धोकादायक असू शकतो.

* पावलांचा आकार बदलणे
बाळंतपणानंतर आपल्या पावलांचा आकार बदलतो, त्यामुळे पायांमध्ये तुमचे जुने शूज येत नाहीत. बाळंतपणानंतर तुम्हाला सूज येण्याची समस्या होत नाही पण तुमच्या पावलांचे स्नायू पूर्ववत होत नाहीत. तसेच यावर मसाज अथवा पेडीक्युअरचा देखील काही परिणाम होत नाही. 

* आवडते कपड्यांचा करावा लागतो त्याग
बाळंतपणानंतर तुमचे पोट लगेच कमी होत नाही म्हणजेच शरीराचा आकार बदलतो त्यामुळे तुमचे आवडते कपडे पुन्हा घालू शकत नाही. त्यांचा त्यागच करावा लागतो. 

* मोठ्या प्रमाणावर केसगळती होते
गरोदरपणात शरीरात होणाऱ्या बदलामुळे बाळंतपणानंतर केस गळती मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे कितीही उपचार करुन व सौदर्यसाधने वापरुन त्यांना पूर्वीप्रमाणे करणे शक्य नसते. 

* आईपणाचा कंटाळा येतो
 दिवसभरात बऱ्याचदा बाळाच्या रडल्याने शिवाय त्याचा सांभाळ करणे, त्याची शी-शू यामुळे तुम्ही कंटाळून जाता. 

* सतत लघवीला होते
बाळंतपणानंतर तुम्हाला लघवी नियंत्रण ठेवणे कठीण होते.

* भुकेचे प्रमाण वाढणे
बाळाला स्तनपान केल्यामुळे तुम्हाला सतत भुक लागते. पण तुम्हाला व्यवस्थित खाण्यासाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे तुम्हाला झोप व भुकेच्या चक्रात अडकून रहाता.

Also Read : ​HEALTH ALERT : प्रेग्नेंसीला बाधक ठरतात ‘ही’ १० कारणे, पुरुषही आहेत जबाबदार !
                    HEALTH : ​दुसऱ्या बाळाच्या तयारीआधी ‘या’ ६ गोष्टी महत्त्वाच्या !

Web Title: HEALTH: Astrophenies Will Be Knowing "These" Things After Birthday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.