HEALTH : हृदयविकारावर बीटचा रस आहे गुणकारी !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2017 06:40 AM2017-05-16T06:40:57+5:302017-05-16T12:10:57+5:30

आपणास हृदयविकार आणि उच्च रक्तदाबसारखे गंभीर आजार असतील तर बीटचा रस नियमित घेतल्यास या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

HEALTH: Beat juice is curative on heart attack! | HEALTH : हृदयविकारावर बीटचा रस आहे गुणकारी !

HEALTH : हृदयविकारावर बीटचा रस आहे गुणकारी !

Next
आपणास हृदयविकार आणि उच्च रक्तदाबसारखे गंभीर आजार असतील तर बीटचा रस नियमित घेतल्यास या आजारांचा धोका कमी होऊ शकतो, असे एका नव्या संशोधनात आढळले आहे. 

कॅनडाच्या ग्युलेफ विद्यापीठात हे संशोधन करण्यात आले आहे. संशोधनात बीटच्या ज्युसमध्ये आहारासाठी आवश्यक असणारे नायट्रेट आढळून आले आहेत. जे शरीरातील रक्तवाहिन्यामध्ये वाढणारा रक्तदाब कमी करण्याचे कमी करते. तसेच ते हृदयरोगासंबंधित आजार दूर करण्यात मदत करत असल्याचे संशोधकांना आढळून आले.

मज्जासंस्थेमध्ये सक्रियता वाढल्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब तसेच रक्तवाहिनीतील आकुंचन यावर नियंत्रण राहण्यास मदत होत असल्याचे संशोधकांनी सांगितले. या अभ्यासासाठी वीस तरुणांनी सहभाग घेतला. यामध्ये त्यांच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या. यात रक्तदाब, हृदयाचे ठोके, स्नायू आकुंचन तपासण्यात आले.

जे सहभागी तरुण बीटचा रस घेत होते, त्यांच्यामध्ये इतरांच्या तुलनेतमध्ये हृदयाचे ठोके आणि रक्तदाब कमी होत असल्याचे दिसून आले. बीटचा रस शरीरासाठी आरोग्यदायी असून, नियमित ज्युस घेतल्याने त्याचा फायदा होत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

Also Read : ​... हे तर ‘हार्टअटॅक’ला निमंत्रण !

Web Title: HEALTH: Beat juice is curative on heart attack!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.