रोज कढीपत्त्याची पाने खाल्ल्याने कमी होईल वजन, सोबतच मिळतील अनेक फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 12:49 PM2024-01-17T12:49:59+5:302024-01-17T12:50:30+5:30

कढीपत्त्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. जे वजन नियंत्रित कमी करण्यासाठी फायदेशीर असतं.

Health benefits and uses of curry leaves | रोज कढीपत्त्याची पाने खाल्ल्याने कमी होईल वजन, सोबतच मिळतील अनेक फायदे

रोज कढीपत्त्याची पाने खाल्ल्याने कमी होईल वजन, सोबतच मिळतील अनेक फायदे

कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्ससारखे आवश्यक पोषक तत्व असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्याशिवाय कढीपत्यांमध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, आयरन, मॅग्नेशिअम, पोटॅशियम आणि झिंकसारखेही मिनरल्स असतात. हे सगळे मिनरल्स हाडे, दात आणि मांसपेशींसाठी महत्वाचे असतात. 

कढीपत्त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जसे की, क्वार्सेटिन, बेटा-कॅरोटीन आणि लुटीन, जे शरीरात स्ट्रेसच्या हार्मोन्सना बॅलन्स करतात.

अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट तुमच्या कोशिका खराब होण्यापासून वाचवतात. याने कॅन्सरसारख्या गंभीर रोगांपासून बचाव होतो. कढीपत्त्यांचा वापर करून तुम्ही अनेक आरोग्यदायी फायदे मिळवू शकता. चला जाणून घेऊ याचे फायदे...

कढीपत्त्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. जे वजन नियंत्रित कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. फायबरचा डाएटमध्ये समावेश केल्याने तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि जास्त खाण्याची ईच्छाही कमी होते. तसेच याने डायजेशन सिस्टीम चांगली राहण्यास मदत मिळते.

डायबिटीज कंट्रोल करण्यास मदत

कढीपत्त्यांमध्ये डायबिटीस कंट्रोल करण्याचे गुण आढळतात. डायबिटीसच्या रूग्णांनी रोज सकाळी रिकाम्या पोटी 5-6 पाने खाल्ल्याने फायदा मिळतो.

पचनासाठी फायदेशीर

कढीपत्त्यांमध्ये पचन सुधारण्यास मदत करणारे एझांइम असतात. यात एमिलेज, लिपेस आणि प्रोटेजसारखे एंझाइम्स कार्बोहायड्रेट्सला तोडण्यात मदत करतात. ज्यामुळे अन्न सहजपणे पचन होतं.

कोलेस्ट्रॉल कंट्रोल होतं

कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. या पानांमधील अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट कोलेस्ट्रॉलचं ऑक्सीकरण रोखण्यास मदत करतात.

त्वचा चांगली राहते

कढीपत्त्यांचं नियमित सेवन केल्याने त्वचा चांगली होते आणि पिंपल्सही दूर होतात. त्वचा चांगली होण्यास याने अनेक फायदे होतात. यात व्हिटॅमिन सी आणि बीटा-कॅरोटीन अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात ज्याने त्वचेला फायदा होतो.

Web Title: Health benefits and uses of curry leaves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.