'हे' आहेत काळ्या मीठाचे आरोग्यदायी फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 06:05 PM2018-07-16T18:05:43+5:302018-07-16T18:06:40+5:30
जेवणामध्ये मीठ नसलं तर ते बेचव लागतं. मीठाशिवाय जेवणाला काहीच अर्थ नसतो. आपण सामान्यतः पांढऱ्या मीठाचा जेवणात समावेश करतो. परंतु पांढऱ्या मीठाचे जास्त सेवन केल्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो.
जेवणामध्ये मीठ नसलं तर ते बेचव लागतं. मीठाशिवाय जेवणाला काहीच अर्थ नसतो. आपण सामान्यतः पांढऱ्या मीठाचा जेवणात समावेश करतो. परंतु पांढऱ्या मीठाचे जास्त सेवन केल्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पांढऱ्या मीठाऐवजी काळ्या मीठाचा वापर करणं आरोग्याच्या दृष्टीने फार हिताचं असतं. काळ्या मीठामध्ये सोडिअम, आयर्न, कॅल्शिअम आणि पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असतं. मीठाचे विविध प्रकार आढळून येतात. पांढरे मीठ हे समुद्राच्या पाण्यापासून तयार करण्यात येतं. काळं मीठ हे त्वचा, केस आणि शरिरासाठी अत्यंत गुणकारी असतं. यामध्ये मिनरल आणि पोषक तत्व आढळून येतात.
- अंगदुखी कमी करण्यासाठी काळ्या मीठाचा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरतं.
- कळ्या मीठामध्ये असलेली पोषक तत्वे त्वचेसाठी फायदेशीर असतात.
- काळ्या मीठामुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. तसेच शरिरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यासही मदत होते.
- केसांचे आरोग्य राखण्यासाठीही काळं मीठ गुणकारी ठरते. काळ्या मीठामुळे केसांतील कोंडा, केसगळती तसेच केस दुभंगणे यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
- शरिरातील आयर्नचे प्रमाण वाढवण्याचे काम काळं मीठ करते.
- काळ्या मीठामध्ये कॅल्शिअम आणि पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असतं. त्यामुळे काळ्या मीठाच्या सेवनानं स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
- पोटाच्या विकारांवरही काळं मीठ गुणकारी ठरतं. यामधील पोषक तत्वे पोटात होणाऱ्या अॅसिडवर कंट्रोल करतात.
- पांढरं मीठ वजन वाढवण्याचं काम करतं तर काळं मीठ वजन कमी करण्यास मदत करतं.