कोथिंबिरीची फुलं खाण्याचे आरोग्यदायक फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 10:43 AM2018-04-14T10:43:15+5:302018-04-14T12:03:18+5:30
ती खायची की नाहीत हा प्रश्न तुम्हाला पडतो का? जर तुम्ही ती फेकत असाल तर त्यातील अनेक आरोग्यदायी फायद्यांपासून तुम्ही दूर राहत आहात.
कोणताही खाद्यपदार्थ असो म्हणजे अगदी आपली छोटीशी भूक भागवणारी भेळ किंवा मस्त वरण हे सारे पदार्थ कोथिंबिरीशिवाय अपूर्णच वाटतात. पदार्थांना चविष्ट करण्यासोबतच अनेक पोषणद्रव्ये कोथिंबिरीमध्ये असतात. पण बाजारातून आणलेली कोथिंबीर खुडून ठेवताना त्यावरील फुलं तुम्ही फेकून देता का ? किंवा ती खायची की नाहीत हा प्रश्न तुम्हाला पडतो का? जर तुम्ही ती फेकत असाल तर त्यातील अनेक आरोग्यदायी फायद्यांपासून तुम्ही दूर राहत आहात.
१) कोथिंबिरीची फुलं खाण्यासाठी सुरक्षित असतात. त्याला विशिष्ट आणि तीव्र गंध असतो. झणझणीत पदार्थांमधील तिखटाचा त्रास होऊ नये म्हणून कोथिंबिर फायदेशीर ठरते. यामुळे थंडावा निर्माण होण्यास मदत होते.
2) कोथिंबिरीच्या फुलांमध्ये मायक्रोन्युट्रिएंट्स आणि अॅन्टीऑक्सिडंट्स असतात. कोथिंबिरीच्या पानांप्रमाणेच त्यांच्या फुलांमध्येही डाएटरी फायबर्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शियम, असतात. तसेच त्यामध्ये व्हिटॅमिन के ब्लड क्लोटींग करण्यास तसेच हृदयाचे कार्य सुरळीत करण्यास मदत करतात.
3) कोथिंबिरीच्या फुलांमुळे पचनक्रिया सुधारते. तसेच पानांसोबत फुलंदेखील खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे मधूमेहींच्या आहारात त्याचा वापर करणे हितकारी ठरते. जेवण तयार झाल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि फुलं यांची सजावट करा. यामुळे तुमचा पदार्थ अधिक चविष्ट आणि आरोग्यदायी होण्यासाठी नक्कीच फायदा होईल.