डायबिटिजपासून लठ्ठपणापर्यंत सर्वच आजारांवर गुणकारी ठरतात 'धने'!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 01:50 PM2019-02-26T13:50:59+5:302019-02-26T13:53:05+5:30

धने म्हणजे सर्वात गुणकारी हर्ब आहे, जे पदार्थाची चव वाढविण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. भारतील पदार्थांमध्ये जरी याचा वापर पदार्थाची चव वाढविण्यासाठी करण्यात येत असला तरिही, धने आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतात.

Health benefits of coriander right from diabetes to obesity and hair | डायबिटिजपासून लठ्ठपणापर्यंत सर्वच आजारांवर गुणकारी ठरतात 'धने'!

डायबिटिजपासून लठ्ठपणापर्यंत सर्वच आजारांवर गुणकारी ठरतात 'धने'!

googlenewsNext

(Image Credit : Anand Vendors)

धने म्हणजे सर्वात गुणकारी हर्ब आहे, जे पदार्थाची चव वाढविण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. भारतील पदार्थांमध्ये जरी याचा वापर पदार्थाची चव वाढविण्यासाठी करण्यात येत असला तरिही, धने आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतात. याची हिरवीगार पानं म्हणजेच कोथिंबीरच नाही तर, धनेही फायदेशीर ठरतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का? धने आरोग्याच्या कोणकोणत्या समस्यांवर गुणकारी ठरतात. जाणून घेऊया धन्यांच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत....

पचनक्रिया सुधारण्यासाठी

धने पचनक्रिया सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. आतड्यांसंबंधी समस्या जसं सूज, गॅस्ट्रिक, डायरिया आणि उलट्या यांसारख्या समस्यांवर गुणकारी ठरतात. जर असं म्हटलं की, पचनाच्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे धने, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. धन्यांमध्ये डायटरी फायबर्स असतात. तसेच यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट्सही मुबलक प्रमाणात असतात. यामुळे लिव्हर योग्य प्रकारे आपलं काम करू शकतं.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी

धने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं आणि गुड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढविण्यासाठी मदत करतं. धन्यांमध्ये कॉपर, झिंक, आयर्न आणि इतर आवश्यक पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. ही सर्व पोषक तत्व शरीरातील रेड ब्लड सेल्स वाढविण्यासाठी मदत करतात. एवढचं नव्हे तर हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतात. धने शरीराचं मेटाबॉलिज्म सुधारण्यासाठीही आवश्यक ठरतं. 

डायबिटीजसाठीही लाभदायक 

डायबिटीजने पीडित लोकांसाठी धने फायदेशीर ठरतात. यामध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टी-ऑक्सिडंट्स आणि इतर आवश्यक तत्त्व असतात. जे ब्लड शुगर रेग्युलेट करण्यासाठी मदत करतात. याव्यतिरिक्त धने वजन कमी करण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत करतात. 

केस आणि त्वचेसाठी फायदेशीर

धन्यांमध्ये व्हिटॅमिन के, सी, बी आणि इतर मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. ही पोषक तत्व स्किन आणि केसांसाठी ते अत्यंत गुणकारी ठरतात. जर दररोज तुम्ही आपल्या डाएटमध्ये धन्यांचा समावेश केला तर ग्लोइंग आणि हेल्दी स्किन मिळवण्यासाठी मदत होते. 

मासिक पाळीच्या समस्यांवर उपाय

मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्त्राव होत असेल तर धने वाटून त्यामध्ये तूप एकत्र करून खाल्याने आराम मिळतो. याव्यतिरिक्त धने पाण्यामध्ये उकळून त्यामध्य थोडीशी साखर एकत्र करून पाणी प्यायल्याने आराम मिळतो. 

Web Title: Health benefits of coriander right from diabetes to obesity and hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.