रोज जीरं आणि गुळाचे सेवन कराल तर 'या' गंभीर समस्यांपासून नेहमी लांब राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 02:11 PM2020-06-28T14:11:50+5:302020-06-28T14:18:05+5:30

जीरं आणि गुळाचे एकत्रित सेवन केल्याने शरीरात ब्लर्ड सर्क्यूलेशन चांगले होते. 

Health benefits of cumin seed and jaggery | रोज जीरं आणि गुळाचे सेवन कराल तर 'या' गंभीर समस्यांपासून नेहमी लांब राहाल

रोज जीरं आणि गुळाचे सेवन कराल तर 'या' गंभीर समस्यांपासून नेहमी लांब राहाल

googlenewsNext

जीरं आपल्या स्वयंपाकघरात नेहमी असते. जीरं घातल्याशिवाय जेवण अपूर्ण वाटते. डाळ, भाज्या यांमध्ये जीरं वापरलं जातं. तसंच गुळाचा वापरही अनेक पदार्थांमध्ये केला जातो. तुम्ही कधी गुळ आणि जीरं एकत्र खाल्ले आहे का? तुमचा विश्वास बसणार नाही जीरं आणि गुळाचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही पदार्थांच्या एकत्रित सेवनाने शरीराला कोणते फायदे मिळतात. याबाबत सांगणार आहोत. 

रक्ताची कमतरता भरून काढता येते

 ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते. त्यांना एनिमियाची समस्या  असते. साधारपणे गर्भवती असताना महिलांना या समस्येचा सामना सगळ्यात जास्त करावा लागतो. गुळात मोठ्या प्रमाणावर आयर्न असते. आयर्नच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढता येऊ शकते. जीरं आणि गुळाचे एकत्रित सेवन केल्याने शरीरात ब्लर्ड सर्क्यूलेशन चांगले होते. NBT

रोगप्रतिकारकशक्ती वाढते 

 जीरं आणि गुळाचं पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे आजार होत नाहीत. सर्दी खोकल्याची समस्या दूर होते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. यामुळे लिव्हरचे आजार होत नाहीत.

डोकेदुखीपासून आराम मिळतो

कामाचा किंवा घरातील इतर गोष्टींचा ताण असल्यामुळे बऱ्याच लोकांना डोकेदुखीचा त्रास जाणवतो. अशी वेळी गूळ आणि जिरेचे पाणी पिण्याने फायदा होतो.

NBT

श्वसनाच्या समस्या

बदलेल्या आणि थंड वातावरणामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी निगडीत आजार होण्याचा धोका असतो. या समस्यांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही जीरं आणि गुळाच्या पाण्याचे सेवन करू शकता. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारे फायबर मोठ्या प्रमाणावर असते. अस्थमा, ब्रोंकायटिस आणि एलर्जी संबंधित आजारांवर गुळाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. याव्यतिरिक्त गुळ आणि जीरं पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी उत्तम ठरतो.

असं तयार करा पाणी

एका  भाड्यात दोन कप पाणी घ्या. यामध्ये दोन ते तीन चमचे गुळाचा चुरा आणि एक चमचा जिरे टाकून चांगले उकळून घ्या. यानंतर हे पाणी कप घेऊन पिऊ शकता. मात्र लक्षात ठेवा, हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी घेल्यास फायदेशीर ठरेल.

काळजी वाढली! लस निष्क्रीय ठरण्याचं कारण असू शकतं कोरोना विषाणूंचे बदलतं स्वरुप

पावसाळ्यात डेंग्यूमुळे ताप आलाय की कोरोना विषाणूंचं संक्रमण झालं आहे; कसं ओळखाल?

Web Title: Health benefits of cumin seed and jaggery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.