थायरॉइडची समस्या दूर करण्यासाठी करा 'हा' आयुर्वेदिक उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 11:26 AM2019-02-21T11:26:49+5:302019-02-21T11:32:30+5:30
वजन कमी करणे, डायबिटीसपासून ते पचनक्रियेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी धने फायदेशीर आहेत.
वजन कमी करणे, डायबिटीसपासून ते पचनक्रियेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी धने फायदेशीर आहेत. धन्याच्या बीयांचं पाणी इतकं फायदेशीर असतं की, हार्मोन्सच्या समस्याही सहजपणे दूर केल्या जाऊ शकता. थायरॉइडसारखी समस्या धन्याचे पाणी रोज सेवन केल्याने काही दिवसात दूर होते असे मानले जाते. डायबिटीससोबतच धन्यांमध्ये असेही तत्व आढळतात ज्याने कॉलेस्ट्रॉल सुद्धा कमी केलं जाऊ शकतं. धन्याच्या पाण्याने जळजळ दूर होते आणि पिंपल्सची समस्याही दूर होते.
(Image Credit : Medical News Today)
थायरॉइडच्या ग्रंथी या फुलपाखरांच्या आकाराच्या असतात, ज्या घशामध्ये असतात. या ग्रंथी मेटाबॉलिज्मला नियंत्रित करतात. म्हणजे जे अन्न आपण सेवन करतो ते ह्या ऊर्जेत बदलण्याचं काम करतात. त्यासोबतच हृदय, मांसपेशी, हाडे आणि कोलेस्ट्रॉलला सुद्धा प्रभावित करतात. थायरॉइड हार्मोन्स शरीरातील ऊर्जेचा स्तर, हार्ट रेट, ब्लड प्रेशर, मूड आणि मेटाबॉलिज्मला रेग्यूलेट करतात. पण या हार्मोन्सचं प्रमाण वाढल्याने किंवा कमी झाल्याने अनेकप्रकारच्या आरोग्यासंबंधी समस्या होऊ शकतात.
आपल्या शरीरात थायरॉइड हार्मोनचा समतोल राहणं गरजेचं असतं हे आत्तापर्यंतच्या लेखांमधून स्पष्ट झालंच. थायरॉइड हार्मोनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराला हायपोथायरॉइडीझम असे म्हणतात, या उलट थायरॉइड हार्मोनचे प्रमाण अधिक झाले तर त्यातून उद्भवणाऱ्या आजाराला थायरोटॉक्सिकोसिस-हायपरथायरॉइडीझम असे म्हणतात.
थायरोटॉक्सिकोसिस व हायपरथायरॉइडीझम या दोहोंमध्ये फरक करणं गरजेचं आहे. या दोन्ही आजारांची लक्षणे साधारणत: सारखी असली तरीही लागणारे उपाय मात्र वेगवेगळे असतात. थायरो-टॉक्सिको-सिसमध्ये रक्तांमधील थायरॉइड हार्मोन प्रचंड प्रमाणात वाढतं. हे अतिरिक्त वाढलेलं प्रमाणच या आजारातील लक्षणांना जबाबदार असतं. थायरोटॉक्सिकोसिस अनेक कारणांमुळे होऊ शकतो. पण ज्यावेळेस थायरॉइड ग्रंथी अधिक सक्रिय होऊन हा आजार होतो त्याला हायपरथायरॉइडीझम असे म्हणतात.
असं तयार करा धन्याचे पाणी
२ चमचे धने किंवा धन्याच्या बीया रात्री एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे धने पाण्यासहीत ५ मिनिटांसाठी उकडा आणि नंतर हे पाणी कोमट झाल्यावर सेवन करा. जर तुम्ही थायरॉइड कंट्रोल करण्यासाठी औषधं घेत असाल तर आधी रिकाम्यापोटी औषध घ्या आणि नंतर ३० मिनिटांनी हे पाणी प्यावे. त्यानंतर ३० ते ४५ मिनिटांना तुम्ही नाश्ता करू शकता. तुम्ही हे पाणी दिवसातून दोनदा रिकाम्या पोटी सेवन करू शकता. हे पाणी थायरॉइड कंट्रोल करण्यात फायदेशीर ठरतं. ३० ते ४५ दिवस या पाण्याचे सेवन केल्यावर तुम्ही तुमच्या थायरॉइडची लेव्हल चेक करा.
थायरॉइड कंट्रोल करण्यासाठी आहारही महत्त्वाचा
१) कॅल्शिअम, व्हिटॅमिन आणि प्रोटीन असलेला आहार थायरॉइड ग्रस्त लोकांसाठी महत्त्वाचा आहे.
२) दूध आणि दह्याचं अधिक सेवन करावं.
३) व्हिटॅमिन डी हायपोथायराइडिज्म आणि याचसारख्या आजारांपासून बचाव करतो.
४) सकाळी लवकर उठून सूर्याच्या किरणांमधून व्हिटॅमिन डी घेण्याचा प्रयत्न करा.
५) व्हिटॅमिन ए सुद्धा फायदेशीर ठरतो. त्यासाठी तुम्ही गाजर, अंडी आणि हिरव्या भाज्यांचं सेवन करा.
६) थायरॉइडची समस्या असल्यावर जास्तीत जास्त फळं आणि हिरव्या भाज्यांचं सेवन केलं पाहिजे.
वजन, कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी या पाण्याचं सेवन करायला हवं. यासाठी तुम्ही तीन मोठे चमचे धन्याच्या बीया एक ग्लास पाण्यात उकडा आणि पाणी अर्ध्यापेक्षा कमी होईल तेव्हा गाळून दिवसातून दोनदा सेवन करा.