मेथीचं पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे, तुम्हालाही नसेल माहीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 11:44 AM2024-02-17T11:44:27+5:302024-02-17T11:46:14+5:30
मेथीच्या बियांचं सेवन करून तुम्ही झोप न येण्याची आणि पोटदुखीची समस्याही दूर करू शकता.
मेथीची भाजी बरेच लोक आवडीने खातात. तसेच मसाल्यांमध्ये मेथीच्या बियांनाही फार महत्वाचं स्थान आहे. मेथीची टेस्ट चांगली असतेच मात्र याचे आरोग्याला होणारे फायदे अनेकांना माहीत नसतात. ज्या लोकांना संडास येण्याची समस्या होते त्यांच्यासाठी मेथीच्या बीया फार फायदेशीर ठरतात. मेथीच्या बियांचं सेवन करून तुम्ही झोप न येण्याची आणि पोटदुखीची समस्याही दूर करू शकता.
बद्धकोष्ठता ही एक अशी समस्या आहे जी सामान्य वाटत असली तरी ज्या व्यक्तीला याचा त्रास होतो त्यांचा जीव अगती मेटाकुटीस आलेला असतो. जर या त्रासापासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल त्यांच्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे लगेच आराम मिळेल.
बद्धकोष्ठतेची समस्या होऊ द्यायची नसेल तर एक चमचा मेथी 2 ग्लास पाण्यात टाकून उकडू द्या. पाण्याला मेथीचा रंग येईपर्यंत हे उकडू द्या. नंतर पाणी गाळून मेथीचे दाणे वेगळे करा आणि पाणी थंड होऊ द्या. हे पाणी कोमट झाल्यावर एक एक घोट याचं सेवन करा. याचा तुम्हाला लवकरच फायदा दिसेल.
मेथीचे इतरही फायदे
ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या असेल त्यांना मेथीच्या पाण्याने आराम मिळेलच, सोबतच याने पचनक्रियाही चांगली होईल. इतकेच नाही तर पोटाशी संबंधित अनेक समस्याही याने दूर होतात. अनेकांना झोप न येण्याची समस्या असते. अशांसाठीही मेथी फायदेशीर ठरते. मेथीच्या पाण्याने तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होते.
मेथीच्या बियांचं या रूपात केल्या गेलेल्या सेवनाने कोलेस्ट्रॉल लेव्हललाही संतुलित करण्यास, किडनीसंबंधी समस्या दूर करण्यास, डायबिटीसची समस्या दूर करण्यास, हृदयासंबंधी समस्या दूर करण्यास आणि केसांची काळजी घेण्यासाठी फायदा होतो. त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे मेथीच्या पाण्याने फुप्फुसांसंबंधी समस्यांचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. या वेगवेगळ्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी मेथीच्या पाण्याचं सेवन आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा करावं.