सकाळी उठल्यानंतर 'हे' छोटंसं काम करा अन् आरोग्याच्या तक्रारींसाठी सतत दवाखान्यात जाणं टाळा
By Manali.bagul | Updated: February 1, 2021 10:01 IST2021-02-01T09:52:12+5:302021-02-01T10:01:09+5:30
Benefits of drinking water in marathi : अनेकजण पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करून सरळ नाष्ता करायला बसतात किंवा चहा पितात.

सकाळी उठल्यानंतर 'हे' छोटंसं काम करा अन् आरोग्याच्या तक्रारींसाठी सतत दवाखान्यात जाणं टाळा
सकाळी उठल्यानंतर निरोगी आणि फिट राहण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या उपाायांचा अवलंब करतात. काहीजण बारिक होण्यासाठी सकाळी उठल्यानंतर गरम पाण्याचे सेवन करतात. तर काहीजण व्यायाम करायला जातात. अनियमित जीवनशैलीमुळे अलिकडे सगळ्यांनाच आजारपणाचा सामना करावा लागतो. सकाळी उठल्यानंतर पाण्याचे सेवन करणं शरीरासाठी चांगलं असतं हे तर तुम्हाला माहितच असेल पण अनेकांना सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते किंवा उठायला उशीर झाल्यानंतर अनेकजण पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करून सरळ नाष्ता करायला बसतात किंवा चहा पितात. त्यामुळे नकळतपणे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. सकाळी पाणी प्यायल्यानं तुम्ही कसे अधिक निरोगी राहू शकता याबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गरम पाण्याचे सेवन केल्यानं शरीरातील विषारी बाहेर टाकण्यास मदत होते. शरीर निरोगी राहण्यासाठी रोज रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन करायला हवे. अनोशापोटी पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व घाण स्वच्छ होण्यास मदत होते आणि रक्त स्वच्छ होण्यासही मदत होते. त्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिण्यास सुरुवात करा आणि हळूहळू याचं प्रमाण वाढवा. यामुळे त्वचा चमकदार होण्यासही मदत होते.
गॅसची समस्या दूर होते
सकाळी रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन केल्यानं गॅस, जळजळ, अपचनाची समस्या दूर होते. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर अनोशापोटी पाणी पित असाल तर तुम्हाला बद्धकोष्टाच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. सकाळी पोट साफ झाल्यामुळे तुम्ही केलेल्या नाश्त्यातील पूर्ण पोषक तत्व मिळण्यास मदत होते.
वजन नियंत्रणात राहते
वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन केल्यानं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन केल्यानं मेटाबॉलिज्म मजबूत राहते.
किडनीसंबंधी समस्यांपासून सुटका मिळते
किडनीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन करायला हवं. त्यामुळे किडनीसंबंधीत समस्यांपासून आराम मिळतो.सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याने गळा, डोळ्यासह किडनीचं आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होते. तसेच शरीराच्या अनेक समस्या दूर होतात.कोरोनाचा असाही फायदा! पूर्णपणे नष्ट झाला आहे दरवर्षी लाखोंना त्रास देणारा हा आजार....
मासपेशींसाठी फायदेशीर
सकाळी पाणी प्यायल्यानं शरीरात नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. त्यासाठी रोज रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन करणं आवश्यक आहे. अंगदुखीचा त्रास कमी होतो. वाढत्या वयात स्वतःला फिट ठेवण्यासाठी धर्मेंद्र करताहेत 'हे' काम; फक्त ३० मिनिटं द्यावी लागणार
(टिप : वरील सर्व उपाय आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.)