मूगाच्या डाळीचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 11:31 AM2018-07-19T11:31:14+5:302018-07-19T11:31:34+5:30
आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी डाळींमध्ये मूगाची डाळ सर्वात फायदेशीर मानली गेली आहे. मूगाच्या डाळीमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई अधिक प्रमाणात आढळतात.
वेगवेगळ्या डाळी आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याच्या आहेत हे सर्वांनांच माहीत आहेत. पण आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी डाळींमध्ये मूगाची डाळ सर्वात फायदेशीर मानली गेली आहे. मूगाच्या डाळीमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई अधिक प्रमाणात आढळतात.
सोबतच पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट आणि फायबरही मोठ्या प्रमाणात असतात. मूगाची सालीची डाळ शिजवून त्यात हिंग आणि जिरे घालून खाल्यास वात, पित्त आणि कफाचा त्रास दूर होतो.
लहान मुलांसाठी फायद्याची
मूगाच्या डाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स आढळतात. मूगाच्या डाळीचं पाणी लहान मुलांसाठी फारच फायद्याचं मानलं जातं. या डाळीचं पाणी पचनासाठी सोपं असतं. याने लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
अनेकदा असं होतं की, शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम जातो यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते. अशावेळी मूगाच्या डाळीचं पाणी प्यायल्याने शरीरात ऊर्जा येते. डॉक्टरांनाही तुम्ही अनेकदा मूगाच्या डाळीचं पाणी पिण्याचा सल्ला देताना पाहिलं असेल. मूगाची डाळ ही शरीर आणि मेंदुसाठी फार फायद्याची आहे. ही डाळ हलकी असल्याने शरीरात गॅस होऊ देत नाही.
पोटदुखीवर उपाय
लूजमोशन झाल्यावर तुमच्या शरीरातील पाणी कमी झाल्यास तुम्ही एक वाटी मूगाच्या डाळीचं पाणी प्यायल्यास फायदा होतो. याने शरीराला पाणी मिळतं आणि या डाळीमुळे पोटाची समस्याही दूर होते. कारण मूगाची डाळ ही पचायला हलकी असते.