सोयाबीनचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 10:24 AM2018-06-15T10:24:24+5:302018-06-15T10:24:24+5:30
सोयाबीन हा आहारातील महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. अहारामध्ये सोयाबीनचा नियमीत वापर केल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो.
सोयाबीन हा आहारातील महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. अहारामध्ये सोयाबीनचा नियमीत वापर केल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो. एका अभ्यासात असेही सांगितले आहे की, सोयाबीनमध्ये आईसोफ्लेवोंस नावाचे एक रसायन असतं. हे रसायन इस्ट्रोजन हार्मोन सारखं असतं. महिलांना ओस्टियोपोरोसिसपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे रेसायन फायदेशीर ठरते.
सोयाबीनचे फायदे शोधण्यासाठी संशोधकांनी सुमारे २०० महिलांवर प्रयोग केले. या २०० महिलांना सहा महिन्यांपर्यंत सोयाबीन प्रोटीनयुक्त आहार दिला. त्यानंतर संशोधकांनी या महिलांच्या हाडांचे संशोधन केल्यास त्यांच्या हाडांमधे अधिक भक्कमपणा व नेहमीच्या तूलनेत अधी निरोगीपणा दिसून आला.
जाणून घ्या सोयाबीनचे फायदे
१) जर आपणास काही मानसिक अजार असेल तर आपल्या अहारात सोयाबीनचा जरूर समावेश करा. सोयाबीन मानसिक संतूलनावर प्रचंड प्रभावी असते.
२) हृदयाच्या आजारवरही सोयाबीन फायदेशीर असते. हृदयाचा आजार असणाऱ्या लोकांनी सोयाबीनचा वापर आहारात करावा असा सल्ला डॉक्टरही देतात.
३) उच्च रक्तदाबावरही सोयाबीन फायदेशीर ठरते. जे लोक सोयाबीनचे नियमीतपणे सेवन करतात त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
४) सोयाबीनपासून लेसीथिन मिळते जे आरोग्याला फारच फायदेशीर असते.
५) सोयाबीनपासून बनवलेले ताक प्यायल्याने पोटांचे विकार कमी होतात.