खाण्यासही फायदेशीर ठरतात ही फुलं; मिळतात 'हे' फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 11:38 AM2018-09-07T11:38:10+5:302018-09-07T11:38:48+5:30

फुलांचा सुगंध मनाला प्रसन्न करतो. त्याचप्रमाणे फुलं दिसण्यासही आकर्षक असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? आपण पूजेसाठी जी फुलं वापरतो ती आपण खाऊही शकतो.

health benefits of eating these flowers | खाण्यासही फायदेशीर ठरतात ही फुलं; मिळतात 'हे' फायदे!

खाण्यासही फायदेशीर ठरतात ही फुलं; मिळतात 'हे' फायदे!

googlenewsNext

फुलांचा सुगंध मनाला प्रसन्न करतो. त्याचप्रमाणे फुलं दिसण्यासही आकर्षक असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? आपण पूजेसाठी जी फुलं वापरतो ती आपण खाऊही शकतो. फुलांमधील पोषक तत्व आरोग्यासाठी लाभदायी ठरतात. जास्तीत जास्त फुलांमध्ये व्हिटॅमिन सी आढळून येतं. अशातच डोळ्यांच्या समस्यांसह अनेक व्याधींवर अनेक फुलं फायदेशीर ठरतात. पण लक्षात ठेवा सर्वच फुलं मानवाच्या शरीरासाठी फायदेशीर ठरत नाहीत तर त्यातील काही फुलं शरीरासाठी घातकही ठरतात. अशातच कोणत्याही फुलाचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा 4 फुलांबाबत ज्यांचं सेवन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

डोळ्यांचा आजार दूर करण्यासाठी फायदेशीर 

झेंडूच्या फुलाचा उपयोग चहामध्ये टाकून करण्यात येतो. या फुलामध्ये मोठ्या प्रमाणावर पिगमेंट लुटिन आढळून येतं. हे डोळ्यांसाठी फार फायदेशीर ठरतं. यामुळे डोळ्यांचं आजारांपासून रक्षण होतं. 1 चमचा झेंडूच्या बियांमध्ये 1 चमचा साखर टाकून 1 कप दूधासोबत रोज सकाळ आणि संध्याकाळी सेवन करा. झेंडूच्या पानांचा काढा तयार करून प्यायल्याने 2 ते 3 वेळा गुळण्या केल्याने गळ्याशी संबंधित समस्या दूर होतात. 

जास्वंदाच्या फुलांमुळे लिव्हरचा प्रॉब्लेम दूर होतो

जास्वंदाच्या फुलांमध्ये अॅन्टी ऑक्सिडंट आढळून येतात. जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगलं कोलेस्ट्रॉल वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्याचबरोबर लिव्हरच्या समस्या दूर करण्यासाठीही हे फायदेशीर ठरतात. याचं नियमित सेवन केल्यानं त्वचा आणि केसांसाठी आरोग्यदायी ठरतं.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर चमेली

चमेलीचे मिश्रण घातलेले सलाद आरोग्यदायी ठरतं. असं सांगण्यात येतं की, यामध्ये अॅन्टी-वायरल गुणधर्म आढळून येतात. चमेलीच्या पाकळ्या खाल्याने माउथ अल्सर, पोटातील जंत, खाज येणं यांसारख्या समस्यापासून सुटका होते. गुलाबामध्ये असलेले लॅक्सेटिव्ह आणि ड्यूरेटिक गुण मेटाबॉलिझम वाढविण्यास मदत करतात. मेटाबॉलिझम वाढल्यामुळे शरीरातील कॅलरी लॉस होऊ लागतात. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. 

शरीराच्या मजबुतीसाठी गुलाब

गुलाबाचा फ्लेवर असलेलं दूध फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही चांगलं असतं. प्राचीन काळापासून या फुलाचा वापर करण्यात येतो. या फुलामध्ये लो कॅलरीज आणि मोठ्या प्रमाणात पाणी आढळते. त्याचबरोबर व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात आढळते. तुम्ही डाएटवर असतानाही या फुलाचा वापर करू शकता. 

Web Title: health benefits of eating these flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.