उन्हाळ्यात टरबूज खाणे असे ठरते फायदेशीर, तर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासही होते मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 10:39 AM2020-05-05T10:39:35+5:302020-05-05T10:45:56+5:30
पचनतंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी टरबूज उपयोगी फळ आहे.तसेच वाढत्या वजनावरही टरबूज खाल्याने नियंत्रण मिळवू शकतो.
उन्हाळ्यात अतिउष्णतेमुळे खूप थकवा जाणवतो. बाहेरून फिरून आल्यावर लगेच घसा कोरडा पडणे आणि अशक्तपणा वाटणे अशा गोष्टी होत असतात. सतत घाम येत असल्यामुळे शरिरातील पाणी त्याद्वारे बाहेर पडत असते. परिणामी थकवा अशक्तपणा वाटतो. अशावेळी स्वतःची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य डाएट घेणे आणि जास्त पाणी पिणे जेणेकरून आपले शरिर हायड्रेड ठेवण्यास मदत होते.
उन्हाळ्यात पौष्टिक आहार घेणे जास्त गरजेचे आहे. अशावेळी रसदार फळांचाही समावेश करणे फायदेशीर ठरते. रसदार फळं खाल्ल्याने शरिर थंड ठेवण्यास मदत होते. म्हणून उन्हाळ्यात टरबूजची मागणी अधिक वाढते. विशेष म्हणजे टरबूज हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीरही ठरते. नियमित सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवल्यास कोणत्याही प्रकारचा व्हायरची लागण होण्यासही बचाव होतो. ज्या लोकांना कामाचा किंवा इतर गोष्टींचा जास्त ताण आहे अशा लोकांनी टरबूजचे सेवन केल्यास डोकं शांत आणि मन प्रसन्न राहते. टरबूज हे अतिशय गुणकारी असे फळ आहे.
टरबूजमध्ये भरपूर व्व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात 'ए' आणि 'सी' व्हिटॅमिन यांत अधिक असल्यामुळे याचा आपल्या शरिराला अधिक फायदा होतो. व्हिटॅमिन 'सी' रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जास्त फायदेशीर ठरते. इतकेच नाही तर टरबूजमध्ये ९० टक्के इतके पाण्याचे प्रमाण असते. टरबूजचे नियमित सेवन केल्यास आपल्या शरिरातील पाण्याचे प्रमाण वाढवण्यासही मदत होते. पचनतंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी टरबूज उपयोगी फळ आहे.तसेच वाढत्या वजनावरही टरबूज खाल्याने नियंत्रण मिळवू शकतो.