किवी फळाचे आरोग्यायी फायदे जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 05:29 PM2018-07-20T17:29:14+5:302018-07-20T17:29:57+5:30
किवी फळाचे उत्पादन सर्वप्रथम चीनमध्ये घेण्यात आले. त्यानंतर हळूहळू त्याची ओळख जगभरात पसरली. न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेला किवीशी साधर्म असल्यामुळे याचे नाव किवी ठेवण्यात आले आहे.
किवी फळाचे उत्पादन सर्वप्रथम चीनमध्ये घेण्यात आले. त्यानंतर हळूहळू त्याची ओळख जगभरात पसरली. न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेला किवीशी साधर्म असल्यामुळे याचे नाव किवी ठेवण्यात आले आहे. न्यूझीलंड, फ्रान्स, इटली, जपान आणि अमेरिका येथे या फळाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. दिसायला तपकिरी रंगाचे असलेले हे फळ आतून हिरव्या रंगाचे असते. याची चव थोडीशी गोड, आंबट लागते. तसेच याचे आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदे असतात. जाणून घेऊयात किवीचे आरोग्यदायी फायदे...
- किवी फळ दिसायला चिकूसारखेच असते. त्यामध्ये 'हिटॅमिन सी' मुबलक प्रमाणात असते.
- किवीमधील पोषक तत्वे डिप्रेशन दूर करण्यास मदत करतात.
- हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही किवीचा फायदा होतो.
- किवीमध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असलेल्यांसाठी हे फळ उपयुक्त आहे.
- किवी फळ खाल्ल्यानं ब्लड शुगर कमी होतं. तसेच दिवसभरातील थकवा दूर होतो. फळाचा आतला भाग जितका गुणकारी आहे तितकीच या फळाची साल सुद्धा गुणकारी आहे. हे फळ डायबिटीजच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त असते.
- पचनक्रिया सुधारण्यासही किवी गुणकारी ठरते.
- किवीचा उपयोग शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी होतो.