फणसाचे हे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 11:55 AM2018-05-26T11:55:43+5:302018-05-26T11:58:36+5:30

कापा आणि बारका अशा दोन प्रकाराचे फणस मिळतात. विविध पदार्थांच्या माध्यमातून फणसाचा आहारात समावेश केला जातो.

health benefits of jackfruit or fanas | फणसाचे हे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

फणसाचे हे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

googlenewsNext

उन्हाळ्यात आंब्यासोबतच फणस खाण्याचीही चांगलीच चंगळ असते. खासकरुन कोकणात याची चांगलीच क्रेझ बघायला मिळते. कापा आणि बारका अशा दोन प्रकाराचे फणस मिळतात. विविध पदार्थांच्या माध्यमातून फणसाचा आहारात समावेश केला जातो. याची चव तर चांगली असतेच त्यासोबतच फणसाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहे. चला जाणून घेऊया या फळाचे आरोग्यदायी फायदे....

1) थायरॉईडपासून आराम – फळांमधून शरीराला मिनरल्सचा पुरवठा होतो. फणसामध्ये कॉपर घटक मुबलक प्रमाणात असतात. त्याचा फायदा थायरॉईडचा त्रास आटोक्यात ठेवला जातो. शरीरातील थायरॉईड हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 

2) रोगप्रतिकारशक्ती सुधारते – व्हिटॅमिन सी युक्त फळांच्या सेवनामुळे नैसर्गिकरित्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारायला मदत होते. फणसामध्ये व्हिटॅमिन सीच्या सोबतच साखरही मुबलक असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. 

3) रक्तदाब नियंत्रणात राहतो – दिवसभरातील शरीराला आवश्यक पोटॅशियमच्या गरजेपैकी 14% गरज केवळ वाटीभर फणसाच्या गरामधून पूर्ण होते. पोटॅशिअमयुक्त हे फळ रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. 

4) पचन सुधारते – फणसामध्ये डाएटरी फायबर्स आणि पाण्याचे प्रमाणही मुबलक असते. यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. आयुर्वेदानुसार, कच्चा  फणस पचनक्रियेचा त्रास असणार्‍यांसाठी पचायला कठीण, त्रासदायक ठरू शकतो.

5) कॅन्सरचा धोका कमी होतो –  फणसामधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक फ्री रॅडिकल्सचा धोका कमी करतात. फणसाचा गर चिकट आणि स्टार्ची असल्याने आतड्यांमधील घातक घटक बाहेर काढण्यास, पचनक्रिया सुधाण्यास मदत करतात. 

6) अ‍ॅनिमिया – फणसामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के यांचं प्रमाण अधिक असतं. सोबतच फॉलिक अ‍ॅसिड, नायसिन, व्हिटॅमिन बी 6 सुध्दा अधिक प्रमाणात आढळतात. तसेच लाल रक्तपेशींना चालना देणारे मॅग्नीज, मॅग्नेशियम, कॉपर घटक यात असल्याने अ‍ॅनिमियाचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.

7) हाडं मजबूत होतात – हाडांना बळकटी देण्यासाठी कॅल्शियम आवशयक असते हे आपण जाणतोच. फणसाच्या मूठभर गरामधून शरीराला 56.1 मिलीग्रॅम कॅल्शियमचा पुरवठा होतो. त्यामुळे ऑस्टोपोरायसिसचा त्रास असणार्‍यांना फणसातून कॅल्शियम मिळते.  

Web Title: health benefits of jackfruit or fanas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.