कारल्याचे हे फायदे वाचून तुम्ही भाजी पाहून मुरडणार नाहीत नाक!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 10:56 AM2018-05-29T10:56:04+5:302018-05-29T10:56:04+5:30

कारलं कडू असल्याने त्यांची भाजी खाण्यास अनेकांना रस नसतो. पण कारले खाण्याचे फायदे जर तुम्हाला एकदा कळाले तर तुम्ही कारल्याच्या भाजीला कधीही नाही म्हणणार नाही.

Health Benefits of Karela | कारल्याचे हे फायदे वाचून तुम्ही भाजी पाहून मुरडणार नाहीत नाक!

कारल्याचे हे फायदे वाचून तुम्ही भाजी पाहून मुरडणार नाहीत नाक!

googlenewsNext

कारल्याची भाजी खायची म्हटलं की अनेकांकडून नाके मुरडली जातात. अनेकांना ही भाजी अजिबातच नको असते. कारलं कडू असल्याने त्यांची भाजी खाण्यास अनेकांना रस नसतो. पण कारले खाण्याचे फायदे जर तुम्हाला एकदा कळाले तर तुम्ही कारल्याच्या भाजीला कधीही नाही म्हणणार नाही. कारलं हे आपल्या शरीरातील रक्त साफ करतं. सोबतच मधुमेहाच्या रुग्णांसाठीही कारलं फायदेशीर असतं. तसेच दमा, पोटदुखी या आजारांवरही हा रामबाण उपाय आहे. 

रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणं

कारल्याचा वापर एका नैसर्गिक स्टेरॉयडच्या रुपात केला जातो. कारण यात केरेटिन नावाचं रसायन अधिक प्रमाणात आढळतं. या सेवन केल्यास रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रित राहते. 

पोषक तत्वांचा भांडार कारलं

कारल्यामुळे शरीरातील शुगर लेव्हल जितकी नियंत्रित केली जाते, तितकं शरीराला पोषक तत्व मिळतात. त्यासोबतच कारल्यात तांब, व्हिटॅमिन बी, अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडसारखे तत्व असतात. यामुळे रक्त साफ स्वच्छ राहतं आणि किडनी सुद्धा निरोगी राहते. 

कारलं खाण्याचे फायदे

- कफचा त्रास असलेल्यांना कारलं खाल्ल्ल्यांने आराम मिळतो. 
- दमा असल्यास विना मसाल्याची भाजी खाल्ल्यास फायदा होतो. 
- पोटात गॅसची समस्या किंवा अपचन झालं असेल तर कारल्याने आराम मिळतो. 
- लखवा गेलेल्या रुग्णांनी कच्च कारलं खाल्ल्यास फायदा होतो. 
- ओमोटींग, पोटात दुखणे यांसारखे त्रास होत असेल तर कारल्याच्या रसात पाणी आणि काळं मिठ घालून प्यायल्यास लगेच आराम मिळतो. 
- काविळ झालेल्यांना आराम मिळण्यासाठीही कारलं फायदेशीर आहे. त्यासाठी रुग्णांनी कारल्याचा रस घ्यावा. 
- कारल्यांच्या रसाचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी दूर होते. 
- तोंडात फोडं आल्यास कारल्याचा रसाने गुरळा करा, याने आराम मिळेल.
 

Web Title: Health Benefits of Karela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.